Sangli: ज्यांना पक्षामधून जायचे असेल त्यांनी आताच जावे, अन्यथा..; जयंत पाटलांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 15:56 IST2025-08-01T15:56:03+5:302025-08-01T15:56:31+5:30

शासनाची ठेकेदारांवर दहशत

Those who want to leave the party should leave now says MLA Jayant Patil | Sangli: ज्यांना पक्षामधून जायचे असेल त्यांनी आताच जावे, अन्यथा..; जयंत पाटलांनी दिला इशारा

Sangli: ज्यांना पक्षामधून जायचे असेल त्यांनी आताच जावे, अन्यथा..; जयंत पाटलांनी दिला इशारा

सांगली : ज्यांना पक्ष सोडून अन्यत्र जायचे असेल त्यांनी खुशाल जावे. ऐन महापालिका निवडणुकीवेळी जे पक्ष सोडून जातील, त्यांचा कार्यक्रम करू, असा इशारा माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी पक्षीय बैठकीत दिला.

सांगलीच्याराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जिल्हा कार्यालयात बुधवारी जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. जयंत पाटील म्हणाले, सत्ताधारी पक्षांबद्दल जनतेच्या मनात नाराजी आहे. तरीही सध्या अनेकजण सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करीत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लोकांच्या सत्ताधारी पक्षांविरोधातील नाराजीचा स्पष्ट कौल दिसून येईल. भविष्यात आपल्या पक्षाला चांगले दिवस येणार आहेत. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढविल्या जातील. पक्षाला मोठे यश मिळेल, याची खात्री आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षात कोणीही जाऊ नये. त्यांचेच नुकसान होईल. ज्यांना जायचे आहे त्यांनी आताच जावे. निवडणुकीच्या काळात ते गेले तर मग कार्यक्रम नक्की होईल, असा इशारा त्यांनी दिला.

शासनाची ठेकेदारांवर दहशत

राज्यातील ठेकेदारांवर शासनाची दहशत आहे. पाच लाख ठेकेदारांची ९० हजार कोटींची बिले थकीत आहेत. यावरून सरकारची आर्थिक स्थिती कोलमडली आहे, हे लक्षात येते, असे मत जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

Web Title: Those who want to leave the party should leave now says MLA Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.