Ram Kadam: हे साधू-संतांचा सन्मान करणारं सरकार, राम कदमांचा तीन पक्षांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 03:33 PM2022-09-14T15:33:27+5:302022-09-14T15:34:55+5:30

मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील चार साधू हे कर्नाटकमधून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी जात होते.

This is a government that honors saints, Ram Kadam targets three parties in case of snagli | Ram Kadam: हे साधू-संतांचा सन्मान करणारं सरकार, राम कदमांचा तीन पक्षांवर निशाणा

Ram Kadam: हे साधू-संतांचा सन्मान करणारं सरकार, राम कदमांचा तीन पक्षांवर निशाणा

Next

सांगली - कोरोनाकाळात पालघरमध्ये मुलं चोरणारी टोळी समजून साधूंना करण्यात आलेल्या बेदम मारहाणीत त्या साधूंचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. दरम्यान, या घटनेची पुनरावृत्ती सांगलीमध्ये घडली असून, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये मुलं चोरणारी टोळी समजून चार साधूंना मारहाण करण्यात आली. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, गैरसमजामधून हा प्रकार घडल्याचे पोलीस तपासामधून समोर आले आहे. याप्रकरणी भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील चार साधू हे कर्नाटकमधून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी जात होते. दरम्यान, जत तालुक्यातील एका गावामध्ये त्यांनी एका लहान मुलाला पत्ता विचारला. ही बाब तिथे असलेल्या काही लोकांनी पाहिली. त्यांना हे साधू म्हणजे मुलं चोरणारी टोळी आहे, असे वाटले. त्यांनी या साधूंना मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे. दरम्यान, आमदार राम कदम यांनी पालघर हत्याकांड प्रकरणाची आठवण करुन देत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. 

सांगलीत प्रकार हा अतिशय निंदनीय आणि घृषास्पद प्रकार आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून दोषींना कठोर शिक्षा मिळेल. कारण, हे बदललेलं सरकार आहे, साधू-संतांचा सन्मान करणारं हे सरकार आहे, असे म्हणत दोषींना कडक शासन होणार असे राम कदम यांनी स्पष्ट केले. पालघर हत्याकांडावेळी फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री होते, आता तसं सरकार नाही. महाराष्ट्राच्या भूमीत कुणी साधू-संतांच्या केसांना जरी हात लावण्याचा प्रयत्न केला, तर अशा व्यक्तींना कडक शासन केले जाणार, असेही राम कदम यांनी म्हटले. 

तीन पक्षांना बोलण्याचा अधिकार नाही

पालघरच्या सांधूंचा आक्रोश संपूर्ण देशाने पाहिले, त्यावेळी थंड बसणाऱ्या तीन पक्षांना सांगलीतील विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. सांगलीचा विषय भाजपने उचलून धरला, कारण हे बदललेलं सरकार आहे. या सरकारच्या कार्यकाळात साधू-संतांच्या केसाला जरी धक्का लागला तरी, त्यांच्यावर कारवाई होणारच, असे राम कदम यांनी म्हटले. 

दरम्यान, पोलिसांनी या साधूंकडील कागदपत्रे आणि ओळखपत्रे तपासली असता ते साधू असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांना गैसरमजामधून मारहाण झाल्याचे समोर आले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, पोलीस अधिक तपास करत आहेत.  
 

Web Title: This is a government that honors saints, Ram Kadam targets three parties in case of snagli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.