लॉकरमध्ये दागिने ठेवायला गेले, ४० तोळे सोन्याची बॅग घेवून चोरटे धूम स्टाईल पळाले; सांगलीत भरदिवसा घडली घटना

By घनशाम नवाथे | Updated: May 2, 2025 13:19 IST2025-05-02T13:16:27+5:302025-05-02T13:19:10+5:30

सांगली : शहरातील गजबजलेल्या कर्मवीर चौकाजवळील कर्मवीर पतसंस्थेत लाॅकरमध्ये दागिने ठेवण्यास आलेल्या धनचंद्र भाऊराव सकळे (वय ६५, रा. क्रांती ...

Thieves loot 40 tolas of gold from elderly woman in broad daylight in Sangli | लॉकरमध्ये दागिने ठेवायला गेले, ४० तोळे सोन्याची बॅग घेवून चोरटे धूम स्टाईल पळाले; सांगलीत भरदिवसा घडली घटना

लॉकरमध्ये दागिने ठेवायला गेले, ४० तोळे सोन्याची बॅग घेवून चोरटे धूम स्टाईल पळाले; सांगलीत भरदिवसा घडली घटना

सांगली : शहरातील गजबजलेल्या कर्मवीर चौकाजवळील कर्मवीर पतसंस्थेत लाॅकरमध्ये दागिने ठेवण्यास आलेल्या धनचंद्र भाऊराव सकळे (वय ६५, रा. क्रांती क्लिनिकजवळ, सांगली) यांची तब्बल ४० तोळे सोन्याची बॅग चोरट्याने धूमस्टाईल लांबविली. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

सकळे हे पाटबंधारे खात्यातील निवृत्त अधिकारी आहेत. कर्मवीर पतसंस्थेत ते खातेदार आहेत. संस्थेत त्यांनी दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी लाॅकर घेतला आहे. चार दिवसापूर्वी लग्नकार्यामुळे त्यांनी दागिने घरात आणले होते. त्यानंतर दागिने परत पतसंस्थेत ठेवण्यासाठी चालकाला घेऊन ते शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास मोटारीतून बाहेर पडले. कर्मवीर पतसंस्थेच्या दारात चालकाने मोटार थांबविली. 

मोटारीचा दरवाजा उघडून सकळे खाली उतरले. तेवढ्यात मागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या हातातील बॅग हिसकावली. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात तो दुचाकीवरुन चौकातून शंभरफुटी रस्त्याकडे वेगाने निघाला. सकळे यांना क्षणभर काही समजले नाही. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे परिसरातील नागरिक धावले. भरदिवसा ४० तोळ्याची बॅग लंपास केल्याचे समजताच सर्वांना धक्का बसला.

चोरट्याचा माग काढण्यासाठी पथके रवाना
 
विश्रामबाग पोलिसांना हा प्रकार कळवला. उपअधीक्षक विमला एम., पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव आणि पथकाने घटनास्थळी येऊन माहिती घेतली. पतसंस्थेतील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात तपासणी केली. तेव्हा एकट्याच चोरट्याने मोटारीच्या मागून येऊन बॅग लंपास केल्याचे दिसून आले. चोरट्याचा माग काढण्यासाठी पथके रवाना केली. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने देखील घटनास्थळी येऊन माहिती घेतली.

Web Title: Thieves loot 40 tolas of gold from elderly woman in broad daylight in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.