भर व्यासपीठावर शिवसेना नेत्याचा खिशा मारणाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 14:28 IST2022-04-01T14:26:50+5:302022-04-01T14:28:06+5:30

सांगलीमध्ये ओबीसी मेळाव्यात त्याने केलेली धाडसी चोरी ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या आधारे सांगोला येथील आरोपी स्वप्निल घुले यास मिरज शहर पोलिसांनी अटक केली.

Thief who stole Rs 50,000 from Shiv Sena leader's pocket arrested | भर व्यासपीठावर शिवसेना नेत्याचा खिशा मारणाऱ्यास अटक

भर व्यासपीठावर शिवसेना नेत्याचा खिशा मारणाऱ्यास अटक

मिरज : शिवसेनासांगली जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्या खिशातून भर व्यासपीठावर लोकांच्या देखत ५० हजार रुपये लंपास करणाऱ्या चोरट्याला मिरज शहर पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. त्याच्याकडील चोरीतील ४३ हजारांची रोकड पोलिसांनी हस्तगत करत त्याला सांगली पोलिसांच्या ताब्यात दिले. स्वप्निल मारुती घुले (२३, रा. सांगोला) असे त्याचे नाव आहे.

घुले हा खिशातून पैसे चोरताना कॅमेऱ्यात कैद झाला होता. सांगलीमध्ये ओबीसी मेळाव्यात त्याने केलेली धाडसी चोरी ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या आधारे सांगोला येथील आरोपी स्वप्निल घुले यास मिरज शहर पोलिसांनी अटक केली.

मेळाव्यास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते वडेट्टीवार यांचा सत्कार करत असताना घुले याने त्यांच्या खिशातील पैशांचे पाकीट लंपास केले. व्यासपीठावरून पन्नास हजार रुपये लंपास केल्याने खळबळ उडाली होती. घुले हा सराईत चोरटा असून, तो कोणत्याही राजकीय पक्षाच्या मेळाव्यात कार्यक्रमात घुसून चोरी करण्यात पटाईत आहे. त्याच्यावर यापूर्वीही अशा प्रकारे चोरी केल्याचे गुन्हे दाखल असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी सांगितले.

Web Title: Thief who stole Rs 50,000 from Shiv Sena leader's pocket arrested