शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या बैठकीत पुन्हा वाद उफाळला

By admin | Updated: November 13, 2016 23:45 IST

सांगलीत बैठक : अशोक चव्हाणांची शिष्टाई

सांगली : विधानपरिषद निवडणुकीतील बंडखोरीचा प्रकार तातडीने थांबवून कॉँग्रेसचे अधिकृत उमेदवार मोहनराव कदम यांना पाठिंबा जाहीर करावा, पक्षाचे आदेश न पाळल्यास तातडीने कारवाई करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी रविवारी विशाल पाटील गटाला दिला. वाद मिटविण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीतच कदम-दादा गटात जोरदार वादावादी झाली. सांगली-मिरज रस्त्यावर पोलिस मुख्यालयाजवळील एका हॉटेलमध्ये रविवारी दादा व कदम गटातील वाद मिटविण्यासाठी अशोक चव्हाण यांनी बैठक घेतली. सांगली-सातारा विधानपरिषदेच्या निवडणुकीत विशाल पाटील गटाने बंडखोरी करून स्वतंत्र उमेदवार दिला आहे. याबाबत पक्षातील अनेक नेत्यांची शिष्टाई असफल ठरल्यानंतर प्रदेशाध्यक्षांनी स्वत: शिष्टाईचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आल्याचे कॉँग्रेस कार्यकर्ते सांगत असले तरी, अद्याप यासंदर्भात विशाल पाटील गटाने कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. चव्हाण यांनी रविवारी सकाळी पतंगराव कदम यांच्या निवासस्थानी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्याकडून निवडणुकीसंदर्भात माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत शेखर माने यांनी मोहनराव कदम यांना पाठिंबा दिला पाहिजे. त्यांनी बंडखोरी थांबविली नाही, तर तातडीने कारवाईचा निर्णयही घेतला जाईल. वसंतदादांच्या जन्मशताब्दीचा सोहळा संपल्यानंतर अशोक चव्हाण यांनी दुपारी एका हॉटेलमध्ये बैठक घेतली. या बैठकीस त्यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. पतंगराव कदम, आ. आनंदराव पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, महापौर हारुण शिकलगार, विशाल पाटील, महापालिकेतील गटनेते किशोर जामदार, पृथ्वीराज पाटील उपस्थित होते. बैठकीत विशाल पाटील यांनी पतंगराव कदम, विश्वजित कदम यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. कोणत्याही राजकीय निर्णयात आम्हाला विश्वासात घेतले जात नाही. पक्षीय स्तरावर ते स्वत:च निर्णय घेत असतात. महापालिकेतही यापूर्वी असेच घडल्याची तक्रार त्यांनी मांडली. पतंगरावांनी हा मुद्दा खोडून काढत, पक्षात कोणाचीही इच्छा नसताना महापालिकेमध्ये यांना उपमहापौरपद दिले. त्यानंतरही यांनी स्वतंत्र गट स्थापून काय काय केले, हे सगळ्यांना माहीत आहे, असे सांगितले. त्यानंतर विशाल पाटील यांनी लोकसभेचा मुद्दा उपस्थित केला. लोकसभेच्या निवडणुकीत यांच्या मतदारसंघात पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला कमी मते मिळाल्याचे सांगितले. पतंगराव म्हणाले की, गत निवडणुकीत मोदी लाटेत सर्वच उमेदवारांना कमी मते मिळाली होती. त्यापूर्वीच्या एका निवडणुकीत काय झाले, हे सगळ्यांना माहीत आहे. आजवर आमच्या मतदार संघातून खासदारकीच्या निवडणुकीत कायम मताधिक्य मिळाले, त्याचा उल्लेख का होत नाही?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी) विशाल पाटील यांना आदेश चव्हाण म्हणाले की, दोन्ही नेत्यांनी एकमेकांची उणी-दुणी काढू नयेत. वाद मिटविले पाहिजेत. पतंगराव कदम हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी काम करावे. मात्र कदम यांनीही सर्वांना विश्वासात घ्यावे. आपसातील मतभेद दूर करावेत. पक्षाला या दोन्ही घराण्यांची आवश्यकता आहे. विशाल पाटील यांनी त्यांच्या नगरसेवकांकडून मोहनराव कदम यांना पाठिंबा जाहीर करावा, असे आदेश त्यांनी दिले. जिल्हाध्यक्ष पदाचाही मुद्दा विशाल पाटील यांनी, मोहनराव कदम यांच्याकडे पंधरा वर्षे असलेल्या जिल्हाध्यक्ष पदाचा मुद्दा उपस्थित केला. अशोक चव्हाण यांनी, याबाबतचा निर्णय प्रदेश कार्यकारिणी घेत असते, त्यामुळे हा विषय आताच काढण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले. अद्याप भूमिका गुलदस्त्यात विशाल पाटील गटाने अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे पक्षाचा आदेश ते पाळणार, की बंडखोरी कायम ठेवणार याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. विशाल पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.