शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
3
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
4
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
5
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
6
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
7
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
8
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
9
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
10
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
11
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
12
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
13
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
14
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
15
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
16
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
17
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
18
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
19
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
20
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Municipal Election: उमेदवारीसाठी पहिली लढाई, मग विरोधकांशी दोन हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 11:54 IST

आरक्षणाने बिघडले गणित; तिकीटासाठी इच्छुकांची झुंबड

शीतल पाटीलसांगली : महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर शहराचे राजकारण तापले आहे. काही प्रभाग राखीव झाल्याने अनेक प्रस्थापित नेत्यांची समीकरणे कोलमडली आहेत, तर नव्या चेहऱ्यांसाठी संधी खुली झाली आहे. त्यामुळे इच्छुकांनी उमेदवारीसाठी नेत्यांच्या कार्यालयात गर्दी केली आहे. इच्छुकांना पहिल्यांदा उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्यानंतर मग प्रभागातील विरोधकांशी सामना होणार आहे. त्यात महायुतीत इच्छुकांची संख्या अधिक असल्याने उमेदवारीसाठी इच्छुकांत मोठी रस्सीखेच आहे. त्यामुळे भाजप - युतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. वर्षभरापासून निवडणुकीची तयारी सुरू केलेल्या इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे. काही इच्छुकांनी शेजारच्या वाॅर्डात चाचपणी सुरू केली आहे, तर राखीव जागांवर घरातील महिला उमेदवार देण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. महायुतीतील भाजपमध्ये इच्छुकांची संख्या अधिक आहे. एका प्रभागात तीन ते पाच दावेदारांनी जोर लावला आहे.भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटात अंतर्गत उमेदवारी, जागा वाटपावरून रस्सीखेच होणार आहे. तिकीट कोणाला मिळणार, यावरून गटबाजी उफाळून येण्याची शक्यता आहे. सध्या इच्छुकांनी मिशन उमेदवारीवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी नेत्यांचे घर, कार्यालयातील चकरा वाढल्या आहेत. कार्यालयातही गर्दी दिसत आहे. प्रभागात चार सदस्यीय पॅनलमधील इतर उमेदवारांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. सह्याद्रीनगर, खणभाग, गर्व्हमेंट काॅलनी, चांदणी चौक, शामरावनगर, गावभाग यासह अनेक प्रभागात इच्छुकांची संख्या वाढल्याने उमेदवारी कोणाला मिळणार, कोणत्या पक्षाची मिळणार, याचीच चर्चा आहे.गेल्या सहा महिन्यात भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झाले. जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनाही जागा वाटपात स्थान द्यावे लागणार आहे. त्यात पाच - दहा वर्षापासून भाजपासाठी काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता भाजप नेत्यांना घ्यावी लागेल. त्यामुळे उमेदवारी वाटपात खऱ्या अर्थाने भाजप नेत्यांची कसरत होणार, हे निश्चित.

महाआघाडीत अजूनही शांतता आहे. काँग्रेस - राष्ट्रवादी शरद पवार गट व उद्धव ठाकरे शिवसेनेकडून चाचपणी सुरू आहे. भाजपच्या विरोधात समविचारी पक्षांना एकत्र करून निवडणूक लढविण्यावर एकमत झाले आहे. पण, सध्या काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीत व्यस्त आहेत. या निवडणुकांनंतरच महाआघाडीचे नेते महापालिका निवडणुकीत लक्ष घालतील, असे कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे. महाआघाडीतही अनेक प्रभागात एकाच जागेसाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे आघाडीच्या नेत्यांना उमेदवारी वाटपावेळी रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

पुढील आठवड्यात पक्षांतर्गत चर्चेला वेगदोन्ही आघाड्यांत सध्या "पहिली लढाई पक्षात, दुसरी विरोधकांशी" अशी स्थिती आहे. तिकीट मिळवण्यासाठी काही जण नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत, तर काही कार्यकर्त्यांचा पाठिंबा दाखवत दबाव तंत्र वापरत आहेत. आगामी आठवड्यात पक्षांतर्गत चर्चांना वेग येणार असून, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी बंडखोरीची शक्यताही नाकारता येत नाही. तिकिटाच्या या लढाईत कोण बाजी मारतो, कोण बाहेर पडतो, याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Election: First Fight for Ticket, Then Against Opposition

Web Summary : Sangli's municipal election heats up post-reservation announcement. Ticket aspirants crowd party offices, battling internally before facing rivals. Factions vie for seats, potential rebellion looms. Alliance talks underway.