इस्लामपुरात शेतकऱ्याच्या ४०० किलो कांद्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:27 IST2021-04-08T04:27:50+5:302021-04-08T04:27:50+5:30

उरुण परिसरातील स्वप्नील पाटील यांच्या शेतातील कांदा पिकाची चोरट्यांनी केलेली नासधूस. लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : येथील उरुण परिसरातील ...

Theft of 400 kg of onion from a farmer in Islampur | इस्लामपुरात शेतकऱ्याच्या ४०० किलो कांद्याची चोरी

इस्लामपुरात शेतकऱ्याच्या ४०० किलो कांद्याची चोरी

उरुण परिसरातील स्वप्नील पाटील यांच्या शेतातील कांदा पिकाची चोरट्यांनी केलेली नासधूस.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : येथील उरुण परिसरातील खोल वाटेवर असणाऱ्या शेतातील अंदाजे ४०० किलो कांद्याची अज्ञात चोरट्याने चोरी केली. ही घटना दोन दिवसांपूर्वी रात्री ते पहाटे घडली. या चोरीने युवा शेतकऱ्याचे किमान ८ ते ९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

स्वप्नील कृष्णात पाटील (वय २४), असे या शेतकऱ्याचे नाव आहे. नोकरी आणि अल्पशा शेतीमध्ये काबाडकष्ट करून तो आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवतो. खोल वाट परिसरातील असणाऱ्या शेतातील पाच गुंठ्यांमध्ये त्याने कांद्याचे पीक घेतले होते. त्यातील तीन गुंठे क्षेत्रातील संपूर्ण कांद्याच्या पिकाची अज्ञाताने चोरी केली, तसेच राहिलेल्या दोन गुंठे क्षेत्रातील कांद्याचीसुद्धा नासधूस केली आहे. या घटनेची पोलिसांत नोंद नाही.

Web Title: Theft of 400 kg of onion from a farmer in Islampur