Accident News Sangli: भरधाव टँकरचे चाक निखळले अन् महिलेच्या डोक्यावर आदळले; जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 03:46 PM2022-12-28T15:46:05+5:302022-12-28T15:46:30+5:30

टँकरचालकाला अपघाताची कोणतीच कल्पना नसल्याने तो अतिवेगाने तसाच पुढे जात होता

The wheels of the tanker came off and hit the head of the woman standing on the road. Death on the spot in sangli | Accident News Sangli: भरधाव टँकरचे चाक निखळले अन् महिलेच्या डोक्यावर आदळले; जागीच मृत्यू

Accident News Sangli: भरधाव टँकरचे चाक निखळले अन् महिलेच्या डोक्यावर आदळले; जागीच मृत्यू

Next

आटपाडी : झरे (ता. आटपाडी) येथे वेगवान टँकरची मागील दोन चाके निखळून रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या महिलेच्या डोक्यावर आदळली. तिचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता पंढरपूर-मल्हारपेठ महामार्गावर घडली. याबाबत सुरेश मधुकर सूर्यवंशी (वय ३२, रा. भुयाचीवाडी, ता. कऱ्हाड, जि. सातारा) या चालकास अटक करण्यात आली आहे. याबाबत प्रकाश जयवंत पवार यांनी आटपाडी पोलिसात तक्रार दिली आहे.

झरे येथील गुरुदत्त इलेक्ट्रिकलचे मालक सुरेश पवार मंगळवारी सकाळी पत्नीसह पाली-खंडोबाला निघाले हाेते. दुकानाच्या मागील बाजूलाच त्यांचे घर आहे. देवदर्शनास जाण्यासाठी पती-पत्नी घरातून बाहेर पडले. सुरेश पवार दुचाकी रस्त्याच्या बाजूला घेऊन स्वच्छ करत होते, तर त्यांच्या पत्नी राणी रस्त्यालगत येऊन थांबल्या होत्या. याचवेळी त्यांच्या शेजारील नारायण सकट यांच्या वाघजाई बोअरवेल या दुकानातून गवंडीकाम करणारे प्रकाश जयवंत पवार (रा. तरसवाडी, ता. खटाव) पत्नी संगीता यांच्यासह बाहेर पडले. 

ते रस्त्यावर उभ्या केलेल्या दुचाकीवर बसत असताना, काही क्षणातच पश्चिमेकडून झरेच्या दिशेने अतिवेगाने टँकर (क्र. एमएच ५० - ८८८८) आला. अचानक या टँकरची मागील दोन चाके निखळली. निखळलेल्या चाकांचा जोड थेट संगीता पवार यांच्या डोक्यावर आदळला. गंभीर मार लागल्याने संगीता यांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्याकडेला उभ्या असलेल्या राणी पवार यांनाही या चाकाची जोरदार धडक बसली. त्याही गंभीर जखमी झाल्या.

ही चाके तशीच धावत पुढे काही वाहनांवर जाऊन आदळली. यामध्ये दोन दुचाकींचे (क्र. एमएच १० सीसी ३०७७ व एमएच ११ सीए ३८५९) तसेच मालवाहतूक वाहनाचे (क्र. एमएच १० डीटी ०१४७) मोठे नुकसान झाले. त्यानंतर वेगात असणाऱ्या चाकाने सचिन राजमाने यांच्या दुकानासमोरील तसेच ब्रह्मचैतन्य चहा सेंटरच्या पाठीमागील दगडी भिंतीला धडक दिली. त्यामध्ये भिंत कोसळली.

चालक अनभिज्ञ, पाठलाग करुन रोखले

दरम्यान, टँकरचालकाला अपघाताची कोणतीच कल्पना नसल्याने तो अतिवेगाने तसाच पुढे शेनवडीच्या दिशेने (ता. माण) जात होता. गावातील काही तरुणांनी पाठलाग करून त्यास रोखले. अपघाताची माहिती आटपाडी पोलिसांना देण्यात आली. अधिक तपास पोलिस निरीक्षक शरद मेमाणे करीत आहेत.

Web Title: The wheels of the tanker came off and hit the head of the woman standing on the road. Death on the spot in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.