शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
2
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
3
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
4
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
5
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
6
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
7
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
8
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
9
महिला आरक्षण: सुप्रिया सुळेंनी CM फडणवीसांचे आव्हान स्वीकारले; म्हणाल्या, “वेळ-जागा सांगा”
10
गुरुपुष्यामृत योग २०२६: केवळ सोने खरेदीच नाही, तर आयुष्याला सोन्याची झळाळी देणारा 'गुरुपुष्य' योग!
11
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
12
गाडी खरेदी करताना शोरूममधूनच इन्शुरन्स घेणे बंधनकारक आहे का? काय आहे नियम?
13
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
14
जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा
15
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
16
एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे
17
Bank Loan Rejection Reasons: पगार भक्कम असूनही बँक कर्ज नाकारतेय? 'या' ४ चुका ठरू शकतात कारणीभूत!
18
Sade Sati: साडेसातीचा विळखा की परिवर्तनाची संधी? मेष, कुंभ आणि मीन राशींसाठी आगामी काळ कसा असेल?
19
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
20
शेवटची इच्छा पूर्ण! 'स्वरस्वामिनी' आशा भोसले यांच्या अस्थींचे पवित्र गंगेत विसर्जन
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेलांचा छोटा पॅक, बडा धमाका; ग्राहकांची अप्रत्यक्ष फसवणूक

By संतोष भिसे | Updated: June 30, 2025 18:52 IST

वजन व किमतीही गोंधळात टाकणाऱ्या

संतोष भिसेसांगली : वाढत्या किंमतीमुळे खप कमी होऊ लागल्याने बिस्किट कंपन्यांनी पुड्यातील बिस्कटांची संख्या कमी केली. हीच क्लृप्ती आता खाद्यतेल कंपन्यांनीही वापरायला सुरुवात केली आहे. किमतीत फारशी वाढ न करता तेलाच्या पिशवीचे वजन मात्र कमी करायला सुरुवात केली आहे. सध्या बाजारात अर्धा, एक किलोएवजी वेगवेगळ्या वजनांच्या पिशव्या मिळत आहेत. यातून ग्राहकांची अप्रत्यक्ष फसवणूक सुरू आहे.तेल कंपन्यांच्या व्यावसायिक स्पर्धेतून पिशव्यांचे वजन कमी होऊ लागले आहे. एरवी पाव किलो, अर्धा किलो, एक किलोची पिशवी घेण्याची सवय असलेल्या ग्राहकांना आता ८७० ग्रॅम, ७४० ग्रॅम, ४३० ग्रॅम, अशा वेगवेगळ्या व गोंधळात टाकणाऱ्या वजनाचे पाऊच घ्यावे लागत आहेत. वजनानुसार वेगवेगळ्या कंपन्यांच्या दराची तुलना करून स्वस्त तेल कोणते याचा निर्णय घेता येत होता. पण, सध्या सर्वच कंपन्यांनी ग्राहकांत गोंधळ निर्माण करणारे वेगवेगळ्या वजनाचे पाऊच बाजारात आणले आहेत. दर तोच, वजन मात्र कमी, असे चित्र आहे.

वजन व किमतीही गोंधळात टाकणाऱ्यासध्या एका कंपनीचा राइस ब्रॅण्डचा खाद्यतेलाचा ८७० ग्रॅमचा पाऊच १५२ रुपयांना घ्यावा लागतो. सरकी तेलाची ८५० ग्रामची पिशवी १२८ रुपयांना उपलब्ध आहे. एका कंपनीचे एक लिटर शेंगदाणा तेल १५८ रुपयांना विकले जाते. सोयाबीनची ८५० ग्रामची पिशवी १२२ रुपयांना मिळते. एका कंपनीची ८७० ग्रॅम वजनाची तेलाची पिशवी १४१ रुपयांना आहे. हे वजन आणि किंमत ग्राहकांना गोंधळात टाकत आहे.

शासनाने गतवर्षापासून स्टॅण्डर्ड पॅकिंगची अट रद्द केली आहे. त्यामुळे अशा वेगवेगळ्या वजनांची पॅकिंग बाजारात येत आहेत. त्यावर प्रतिग्रॅम किंवा प्रतिमिली किंमत लिहिण्याचा नियम केला आहे. यातून ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्राहकांनी प्रतिग्रॅम किंवा प्रतिमिली दर पाहूनच वस्तूची किंमत निश्चित करावी व खरेदी करावी. - दत्तात्रय पवार, उपनियंत्रक, वजन-मापे विभाग