Sangli ZP Election 2026: खानापुरात भाजप विरुद्ध शिंदेसेनेत चुरशीची लढत; सुहास बाबर अन् वैभव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 19:04 IST2026-02-04T19:03:36+5:302026-02-04T19:04:23+5:30

नागेवाडी वगळता तीन गटांत चुरस : भाळवणी, लेंगरे गटाकडे लागले लक्ष

the prestige of Shinde Sena MLA Suhas Babar and BJP's Vaibhav Patil is at stake In the Zilla Parishad elections in Khanapur Sangli | Sangli ZP Election 2026: खानापुरात भाजप विरुद्ध शिंदेसेनेत चुरशीची लढत; सुहास बाबर अन् वैभव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला

Sangli ZP Election 2026: खानापुरात भाजप विरुद्ध शिंदेसेनेत चुरशीची लढत; सुहास बाबर अन् वैभव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला

दिलीप मोहिते

विटा : खानापूर तालुक्यातील चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती गणातील निवडणूक प्रचाराच्या अखेरीस भाजप विरुद्ध शिंदेसेनेत मोठी चुरस निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत आहे. शिंदेसेनेचे आ. सुहास बाबर यांचे होमपीच असलेला नागेवाडी जिल्हा परिषद गट वगळता उर्वरित तीन गटात चांगली टक्कर लागल्याचे चित्र आहे. दरम्यान, प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या भाळवणी व लेंगरे जि.प. गटाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

खानापूर तालुक्यातील नागेवाडी, लेंगरे, करंजे व भाळवणी या चार गटासह नागेवाडी, गार्डी, लेंगरे, पारे, करंजे, बलवडी (खा.), आळसंद व भाळवणी या आठ गणात निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. शिंदेसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. भाजपचे आ. गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद पडळकर, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी भाजपची धुरा खांद्यावर घेतली असून, शिंदेसेनेचे आ. सुहास बाबर, उपनगराध्यक्ष अमोल बाबर हे दोघे बंधू शिंदेसेनेचे नेतृत्व करीत आहेत. 

ग्रामीण भागावर आ. सुहास बाबर यांची पकड आहे. त्यामुळे त्यांनी चारही जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती गणात शिंदेसेनेचे सर्व उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा केला आहे. तर विरोधी भाजपनेही सर्व गटात उमेदवार देऊन पक्षाने आव्हान उभे केले आहे. या निवडणुकीत पंचायत समितीत नक्कीच सत्तांतर होणार असल्याचा दावा माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी केला आहे.

भाळवणी गटात शिंदेसेनेचे उमेदवार हिंमतराव जाधव यांच्यासमोर त्यांच्या आळसंद गावातील भाजपचे उमेदवार नितीन जाधव यांनी आव्हान उभे केले आहे, तर भाळवणी गणात भाजपचे मोहन धनवडे विरुद्ध शिंदेसेनेचे महेश घोरपडे यांच्यात लढत होत आहे. आळसंद गणात भाजपचे आकाश माने विरुद्ध शिंदेसेनेचे रोहन जाधव यांच्यात टक्कर होत आहे. नागेवाडी जिल्हा परिषदेसाठी आ. दिवंगत अनिल बाबर यांच्या स्नुषा डॉ. शीतल अमोल बाबर मैदानात उतरल्या आहेत. त्यांच्या विरोधात भाजपच्या सुजाता माने निवडणूक लढवीत आहेत. 

लेंगरे गटातही भाजपच्या आरती मोरे विरुद्ध शिंदेसेनेच्या मनीषा बागल यांच्यात काट्याची टक्कर होत आहे. करंजे गटात शिंदेसेनेच्या सई शिंदे विरुद्ध भाजपच्या प्रिया खंदारे-पाटील यांच्यात चुरस असून, बलवडी खा. गणात शिंदेसेनेचे माजी जि. प. सदस्य सुहास शिंदे विरुद्ध भाजपचे तानाजी पाटील यांच्यात टक्कर होत आहे. या लढतीकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत.

सुहास बाबर अन् वैभव पाटील यांच्यात प्रतिष्ठेची लढाई

जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक शिंदेसेनेचे आ. सुहास बाबर व विरोधी भाजपचे नेते ॲड. वैभव पाटील यांच्यात प्रतिष्ठेची झाली आहे. भाजपचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खानापूर तालुक्यात प्रचारसभा घेतल्या असल्या तरी शिंदेसेनेचे आ. सुहास बाबर व उपनगराध्यक्ष अमोल बाबर हे दोघे बंधूच गड लढवीत आहेत. त्यामुळे खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक चुरशीने होत आहे.

Web Title : सांगली ZP चुनाव: खानापुर में भाजपा बनाम शिंदे सेना का मुकाबला

Web Summary : खानापुर ZP चुनाव में भाजपा और शिंदे सेना के बीच कड़ी टक्कर। सुहास बाबर और वैभव पाटिल की प्रतिष्ठा दांव पर। भाळवणी और लेंगरे समूहों पर ध्यान केंद्रित। चार ZP और आठ पंचायत समिति निर्वाचन क्षेत्रों में कड़ी प्रतिस्पर्धा।

Web Title : Sangli ZP Election: BJP vs. Shinde Sena face-off in Khanapur.

Web Summary : Khanapur ZP election witnesses a fierce battle between BJP and Shinde Sena. Suhas Babar and Vaibhav Patil's prestige is at stake. Focus on Bhalwani and Lengre groups. Tight contests in four ZP and eight Panchayat Samiti constituencies.