Sangli ZP: सांगली झेडपीतील सत्तेसाठी मुंबईत चर्चेच्या फेऱ्या; सुहास बाबर उपमुख्यमंत्र्यांना भेटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 19:21 IST2026-02-18T19:20:47+5:302026-02-18T19:21:16+5:30

सांगलीत भाजपची गटनेता निवड

The power calculations of Sangli Zilla Parishad and Panchayat Samiti are not yet resolved, Suhas Babar met the Deputy Chief Minister | Sangli ZP: सांगली झेडपीतील सत्तेसाठी मुंबईत चर्चेच्या फेऱ्या; सुहास बाबर उपमुख्यमंत्र्यांना भेटले

Sangli ZP: सांगली झेडपीतील सत्तेसाठी मुंबईत चर्चेच्या फेऱ्या; सुहास बाबर उपमुख्यमंत्र्यांना भेटले

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या निकालाला आठवडा झाला, तरी सत्तेची गणिते अद्याप सुटलेली नाहीत. सर्वच प्रमुख पक्षांमध्ये बैठकांचे आणि चर्चेचे सत्र सुरू आहे. दरम्यान, बुधवारी भाजप, शिंदेसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या स्तरावर महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची मिरजेत सोमवारी शिंदेसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यासोबत झालेली बैठक निर्णयाविना संपली. तीनही पक्ष अध्यक्षपदावर अडून आहेत. हा प्रश्न आता मुंबईत पोहोचला असून तेथेच तोडग्याची अपेक्षा आहे. उद्या (बुधवारी) महायुतीचे वरिष्ठ नेते आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक होणार आहे. पक्षप्रमुखांसोबतच्या चर्चेनंतर अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत हा विषय नेला जाण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासह शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यावेळी उपस्थित राहणार आहेत.

सत्तास्थापनेचे गणित सुटले नसले, तरी भाजपने आपल्या स्तरावर गटस्थापनेची तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या १६ सदस्यांची बैठक बुधवारी (दि. १८) सांगलीत बोलविण्यात आली आहे. त्यावेळी गट स्थापना केली जाणार आहे. तसेच गटनेताही निवडला जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी दिली. गटनेता कोण होणार? याचा निर्णय सदस्यांच्या बैठकीत होणार असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, आमदार सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती पक्ष आणि जनसुराज्य पक्षाने भाजपला निवडणुकीपूर्वीच पाठिंबा दिला आहे. त्यांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून आला आहे. यामुळे या तिघांचे एकत्रित संख्याबळ १८ झाले आहे. बुधवारी भाजपच्या गटस्थापनेच्या आणि गटनेता निवडीच्या बैठकीला हे दोन्ही पक्षांचे सदस्य उपस्थित राहणार नाहीत, मात्र एक-दोन दिवसांत त्यांच्या अधिकृत पाठिंब्याची कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

शिंदेसेनेनेही पाठिंबा आणि अध्यक्षपद यासाठी वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा सुरु केली आहे. जिल्हा परिषदेच्या सत्तेमध्ये कुणासोबत युती करायची, तसेच अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर हे मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे पंतप्रधानांच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने बाबर यांची संध्याकाळपर्यंत भेट झाली नाही. आता बुधवारी होणाऱ्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत ते सहभागी होण्याची शक्यता आहे. बैठकीत अध्यक्षपदाचा तोडगा निघणार का? याकडे लक्ष लागून राहिले आहे.

राष्ट्रवादीचा आज मेळावा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) नवनिर्वाचित सदस्यांची बैठक आणि त्यांचा सत्कार सोहळा. बुधवारी सांगलीत होणार आहे. विश्रामबागमध्ये कुपवाड रस्त्यावर उत्कर्ष हॉलमध्ये दुपारी १२ वाजता मेळावा होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनी दिली. त्याचवेळी गटस्थापना आणि गटनेत्याच्या निवडीची शक्यता आहे. आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते सदस्यांचा सत्कार होणार आहे.

सांगलीची स्थिती फारच अवघड!

दरम्यान, सत्तास्थापना आणि अध्यक्ष निवडीचा विषय गुंतागुंतीचा होत असल्याने भाजप नेतेही विचारमंथनात आहेत. स्वत: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच पत्रकारांशी बोलताना सांगलीची स्थिती फारच अवघड असल्याचे वक्तव्य केले आहे.

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेबाबत सहकारी पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. भाजपला पाठिंब्याबाबत सहकारी पक्षांत राजकीय मतभेद स्वाभाविक आहेत. यापूर्वी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात (अजित पवार) काही ठिकाणी लढलो असलो आणि काही वेळा त्यांच्याविरोधात राजकारण केले असले, तरी जिल्हा परिषदेत सत्तेचे गणित जमण्याविषयी शंका नाही. - सम्राट महाडिक, जिल्हाध्यक्ष भाजप

Web Title : सांगली ZP सत्ता संघर्ष: मुंबई में चर्चा, सुहास बाबर ने उप मुख्यमंत्री से मुलाकात की

Web Summary : सांगली ZP में सत्ता समीकरण अनसुलझे हैं। गठबंधन की वार्ता जारी है, अध्यक्ष पद को लेकर समाधान खोजने के लिए प्रमुख नेता मुंबई में बैठक कर रहे हैं। बीजेपी समूह गठन की तैयारी कर रही है। राजनीतिक जटिलताओं के बीच चर्चा जारी है।

Web Title : Sangli ZP Power Struggle: Discussions in Mumbai, Suhas Babar Meets Deputy CM

Web Summary : Sangli ZP power equations remain unresolved. Coalition talks are ongoing, with key leaders meeting in Mumbai to find a solution regarding the president post. BJP prepares for group formation. Discussions continue amidst political complexities.