शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

सांगली: दूध व्यावसायिकाने डेअरीला घातला पावणेतीन कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 18:36 IST

जळगावच्या आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या आठवड्यात ही कारवाई केली.

सांगली : बोदवड (जि. जळगाव) येथील डेअरीचालकाला पावणेतीन कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी दूध व्यावसायिक ज्ञानदेव गणपती साळुंखे (वय ५४, रा. दीपनगर, जयसिंगपूर) याला अटक करण्यात आली. साळुंखेसह अमित बाबासाहेब शेळके (रा. तावदरवाडी, ता. पलूस), अनुप भगवान काळे (रा. कोयनानगर-चिंचवड, ता, हवेली, जि. पुणे) व प्रशांत ऊर्फ सोमनाथ प्रकाश मंगुरकर (रा. टाकळीरोड, मिरज) यांच्यावरही यापूर्वीच गुन्हा दाखल आहे. जळगावच्या आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या आठवड्यात ही कारवाई केली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. २७ फेब्रुवारी २०१७ ते २८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत फसवणुकीचा प्रकार घडला. फिर्यादी अमरलाल परमानंद खत्री (रा. बोदवड) यांचा दूध डेअरी व दुधाच्या उत्पादनाचा व्यवसाय आहे. खत्री यांनी १५० टन दूध भुकटी पुरविण्यासाठी संशयितांशी करार केला होता. यातील संशयित प्रशांत मंगूरकर याच्या मिरज येथील बँक खात्यावर त्यांनी दोन कोटी ७५ लाख रुपयांची रक्कम भरली होती. मात्र, त्यानंतर संशयितांनी दूध पावडर पुरविली नव्हती.अमित शेळके व अनुप काळे हे यड्राव येथील माउली फुडसचे संचालक व मालक आहेत, तर प्रशांत मंगूरकर हा माउली फूड्स अंतर्गत सिद्धार्थ ब्रॅन्ड दूध भुकटी खरेदी-विक्रीचा वितरक आहे. खत्री यांनी विविध बँक खात्यांतून दोन कोटी ७५ लाख रुपयांची रक्कम मंगूरकर याच्या बँक खात्यात जमा केली होती. पैसे जमा केल्यानंतर भुकटीसाठी तगादा लावल्यानंतर त्यांनी टाळाटाळ सुरू केली होती. यानंतर मंगूरकर याने खत्री यांना दोन कोटींचा दिलेला धनादेशही वटला नव्हता. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर खत्री यांनी मंगूरकर, काळे व शेळके यांच्याविरोधात पोलिसांत फिर्याद दाखल केली होती.साळुंखेच्या सांगण्यावरूनच फसवणूकपोलीस तपासात या तिघांनीही साळुंखे याच्या सांगण्यावरूनच ही फसवणूक केल्याचे समोर आले होते. तिघांनी आपल्या खात्यावरील रकमेपैकी दोन कोटी ६० लाख रुपये साळुंखे याच्या सांगलीतील बँक खात्यात वळवले होते. साळुंखेचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर दि. १३ ऑक्टोबरला पोलिसांनी त्याला अटक केली. त्यावेळी त्याची पाच दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीmilkदूधfraudधोकेबाजी