Sangli: शेळ्यांनी सोन्याचे कर्णवेल गिळले, डॉक्टरांनी पोट फाडून बाहरे काढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 16:20 IST2025-05-20T16:19:48+5:302025-05-20T16:20:34+5:30

मिरज : सोनी (ता. मिरज) येथील शेतकऱ्याच्या घरातील दोन शेळ्यांनी गिळलेले सोन्याचे कर्णवेल शेळ्यांचे पोट फाडून बाहेर काढण्यात आले. ...

The golden cornflower swallowed by the goats was torn open and taken out in miraj sangli | Sangli: शेळ्यांनी सोन्याचे कर्णवेल गिळले, डॉक्टरांनी पोट फाडून बाहरे काढले

Sangli: शेळ्यांनी सोन्याचे कर्णवेल गिळले, डॉक्टरांनी पोट फाडून बाहरे काढले

मिरज : सोनी (ता. मिरज) येथील शेतकऱ्याच्या घरातील दोन शेळ्यांनी गिळलेले सोन्याचे कर्णवेल शेळ्यांचे पोट फाडून बाहेर काढण्यात आले. शेळ्यांच्या पोटाच्या शस्त्रक्रियेत सोन्याचे दोन कर्णवेल सापडले. मिरजेच्या पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातील पशू रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली.

मिरज तालुक्यातील सोनी येथील अशोक गाडवे या शेतकऱ्याच्या मुलीने घरात भांडी घासताना तिच्या दोन्ही कानातील काढून ठेवलेल्या सोन्याच्या कर्णवेल खरकट्यात पडल्या. हे खरकटे पाणी तेथे असलेल्या गाडवे यांच्या दोन्ही शेळ्यांनी पिले. खरकट्यासोबत शेळ्यांनी त्या कर्णवेलही गिळल्या. कर्णवेल गायब झाल्याने तेथे असलेल्या शेळ्यांनी त्या गिळल्याचा गाडवे यांचा अंदाज होता. 

गाडवे यांनी मिरजेच्या शासकीय पशू रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय ढोके यांच्याशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. गाडवे यांच्या पाच वर्षे वयाच्या दोन्ही शेळ्यांच्या पोटाचा एक्स-रे काढल्यानंतर दोन्ही शेळ्यांच्या पोटात काहीतरी असल्याचे दिसले. यामुळे डॉक्टर ढोके यांनी दोन्ही शेळ्यांची पोटाची शस्त्रक्रिया (रुमीनाटॉमी)करून सुमारे ३० हजार किमतीचे सोन्याचे दोन कर्णवेल बाहेर काढले. चुकून सोन्याचे कर्णवेल गिळणाऱ्या शेळ्यांना मात्र शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले.

डॉ. ढोके म्हणाले, शेळ्या, गाय, म्हैस, बैल हे प्राणी खाल्ल्यानंतर रवंथ करतात. त्यांच्या पोटाची रचना चार कप्प्याची असते. या प्राण्यांनी सुई, तार, खिळा, मोळा गिळल्यास त्यांच्या हृदयाला इजा होण्याचा धोका असल्याने अशा टोकदार वस्तू तातडीने बाहेर काढाव्या लागतात. मात्र सोन्याचे दागिने किंवा अन्य न टोचणाऱ्या वस्तू त्या पोटात तशाच राहतात. त्याचा त्या प्राण्यालाही काही त्रास होत नाही. मात्र शेळ्यांनी सोन्याची कर्णवेल गिळल्याने त्यांची शस्त्रक्रिया करावी लागली. शस्त्रक्रियेनंतर दोन्ही शेळ्यांची प्रकृती उत्तम असल्याचेही डॉ. ढोके यांनी सांगितले.

Web Title: The golden cornflower swallowed by the goats was torn open and taken out in miraj sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.