शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

यंत्र टाळणार सिलिंडर स्फोटाचा धोका, सांगलीतील आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी तयार केली नामी उपकरणे 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 5:14 PM

आधी हेल्मेट, मगच दुचाकी

सांगली : दैनंदिन व्यवहारातील अनेक समस्या, संकटांचे निवारण करणारी नामी उपकरणे येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी तयार केली आहेत. स्वयंपाकघरात गॅस गळतीमुळे स्फोट होऊन अनेक कुटुंबे उदध्वस्त होतात. ही गळती शोधणारे उपकरण विद्यार्थ्यांचा संशोधक वृत्तीचे फलित ठरले आहे.सिलिंडरचा कॉक बंद न केल्याने किंवा रबरी रिंग खराब झाल्याने अनेकदा स्वयंपाकघरात गॅसची गळती होते. सकाळी स्वयंपाकासाठी किंवा पाणी तापविण्यासाठी शेगडी पेटविताच गॅसचा भडका होतो. प्रसंगी सिलिंडरचा स्फोटही होतो. गृहिणींना अनेकदा ही गळती लक्षात येत नाही. हॉटेल्स, उद्योग येथेही गॅस गळतीमुळे स्फोटाच्या दुर्घटना घडतात. ही गॅसची गळती शोधण्यासाठी विद्यार्थ्यांनी गॅस सेन्सर विकसित केला आहे.जेव्हा गॅस गळती होते, तेव्हा हा सेन्सर कार्यान्वित होतो. तत्काळ अलार्म वाजू लागतो. घरातील सर्व विद्युत दिवे आपोआप बंद होतात. अलार्ममुळे गॅस गळती लक्षात येऊन दुर्घटना टळते. अक्षय पाटील, संकेत कांबळे, प्रदीप खरात, विद्या पाटील, प्रियंका शिरोळकर या विद्यार्थ्यांनी उपकरण विकसित केले आहे.आयटीआयमध्ये नुकत्याच झालेल्या तंत्र प्रदर्शनात त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संकेत आवटी, यश पवार, अथर्व चव्हाण, अवधूत साळुंखे, सूरज जमादार या विद्यार्थ्यांनी दुहेरी काम करणारी हायड्रॉलिक प्रेस तयार केली आहे. व्यवहारात एकेरी काम करणारी प्रेस वापरली जाते, त्यामुळे ही प्रेस वेगळी ठरली आहे.या विद्यार्थ्यांना त्यांना गटनिदेशक अशोक चंदे, शिवाजी चव्हाण, प्राचार्य व्ही. बी. देशपांडे, उपप्राचार्य एम. एस. गुरव, शिवाजी गोसावी आदींनी मार्गदर्शन केले.

आधी हेल्मेट, मगच दुचाकीहेल्मेट घालून दुचाकी चालवावी यासाठी वाहतूक पोलिस कितीही प्रबोधन करत असले, तरी वाहनचालक ऐकत नाहीत. यावर उपाय म्हणून सेन्सरयुक्त हेल्मेट विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. चालकाने डोक्यावर हेल्मेट घातल्यानंतरच दुचाकी सुरू होते.

टॅग्स :Sangliसांगलीiti collegeआयटीआय कॉलेजStudentविद्यार्थी