कसबे डिग्रजमध्ये उद्यापासून दहा दिवस लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:23 IST2021-04-26T04:23:17+5:302021-04-26T04:23:17+5:30

कसबे डिग्रज : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, दि. २७ ते ६ मेदरम्यान लॉकडाऊन करण्याचा निर्णय ...

Ten days lockdown from tomorrow in Kasbe Digraj | कसबे डिग्रजमध्ये उद्यापासून दहा दिवस लॉकडाऊन

कसबे डिग्रजमध्ये उद्यापासून दहा दिवस लॉकडाऊन

कसबे डिग्रज : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, दि. २७ ते ६ मेदरम्यान लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची कडक अंमलबजाणी करण्यात येणार आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत पदाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन समिती व गावातील व्यापारी यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सांगली जिल्हा फोटोग्राफर संघटनेचे उपाध्यक्ष मौलाली कोठावळे यांनी नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कारवाईची मागणी केली आहे. नागरिकांनी लाॅकडाऊनला प्रतिसाद देऊन नियमांचे पालन करावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थान समितीने केले आहे.

यावेळी तंटामुक्ती समिती अध्यक्ष आनंदराव नलवडे, उपसरपंच सागर चव्हाण, संदीप निकम, प्रमोद चव्हाण ग्रामविकास अधिकारी आर. डी. शिंदे तलाठी के. एल. रूपनार, संजय शिंदे, आरिफ खाटीक, अरुण पवार, गजानन गावडे आदी उपस्थित होते.

Web Title: Ten days lockdown from tomorrow in Kasbe Digraj