शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी बँकांच्या चौकशीला तांत्रिक ‘ब्रेक’

By admin | Updated: November 16, 2014 23:54 IST

गोंधळ कायम : स्थगिती उठविल्याबाबतचे आदेशच नाहीत

सांगली : राज्यातील सहकारी संस्थांमधील कलम ८८ नुसार सुरू असलेल्या चौकशीवरील स्थगिती उठविली असल्याचे नव्या सहकारमंत्र्यांनी सांगितले असले तरी, प्रत्यक्षात त्याबाबतचे कोणतेही लेखी आदेश जिल्हापातळीवर देण्यात आलेले नाहीत. तांत्रिक अडचणींमुळे स्थगिती उठविण्याबाबतचे घोडे अडले असल्याचे समजते. सांगली जिल्ह्यातील वसंतदादा शेतकरी सहकारी व मिरज अर्बन या दोन बॅँकांच्या चौकशीवरील स्थगिती उठविण्यात आल्याबाबतचे आदेशही अद्याप प्राप्त झालेले नाहीत. विनातारण कर्ज, कमी तारणावरील कर्ज, नियमबाह्य कर्जवाटप अशा प्रकरणात बॅँकांचे झालेले कोट्यवधी रुपयांचे नुकसान संबंधित दोषी असणाऱ्या संचालक व अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यासाठी सहकार कायदा कलम ८८ नुसार चौकशीचे आदेश तत्कालीन सहकार आयुक्तांनी दिले होते. या आदेशाला आघाडी सरकारच्या कालावधित स्थगिती देण्यात आली. त्यामुळे कारवाईची टांगती तलवार असलेल्या संचालकांचा जीव भांड्यात पडला. राज्यातील सरकार बदलल्यानंतर आता अशा वादग्रस्त सहकारी संस्थांचे ग्रह फिरले आहेत. नव्या सहकारमंत्र्यांनी लगेचच राज्यातील अशा सर्व संस्थांवरील स्थगिती उठविल्याचे स्पष्ट केले. दोन बँकांच्या तत्कालीन संचालकांनाही या चर्चेने हादरा बसला. चौकशी आणि वसुलीचे भूत मानगुटीवर बसणार म्हणून भीती व्यक्त केली जाऊ लागली. प्रत्यक्षात सहकारमंत्र्यांच्या या माहितीला अद्याप लेखी आदेशाने मूर्त स्वरूप प्राप्त झाले नाही. जिल्ह्यातील दोन बॅँकांबाबत तरी अद्याप कोणतेही लेखी आदेश आलेले नाहीत. स्थगिती उठविण्यापूर्वी सुनावणीची प्रक्रिया घेऊन, तांत्रिक बाबींची पडताळणी करून लेखी आदेश काढावे लागणार असल्याने त्याबाबतची चर्चा सहकार विभागात सुरू असल्याचे समजते. चौकशीवरील स्थगिती उठल्याची केवळ चर्चाच सुरू आहे. तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या चौकशींवर स्थगिती दिली होती. स्थगितीची मुदतही वारंवार वाढविण्यात आली. स्थगितीमुळे संस्थांमधील आर्थिक घोटाळे दडपले जात आहेत की काय, अशी शंका उपस्थित होऊ लागली. ठेवीदारांच्या ठेवींचेही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागले आहेत. (प्रतिनिधी)आदेश नाहीत : जाधवकलम ८८ च्या चौकशीवरील स्थगिती उठविल्याबाबत अद्याप आमच्याकडे कोणतेही आदेश आलेले नाहीत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. एस. एन. जाधव यांनी दिली.