शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बँकेची सभा गोंधळातच गुंडाळली

By admin | Updated: September 6, 2015 22:58 IST

‘मंजूर-नामंजूर’च्या घोषणा : सत्ताधाऱ्यांचा वरचष्मा कायम; विरोधकांकडून घोषणाबाजी, निदर्शने

सांगली : प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत रविवारी शिक्षक सभासदांनी यंदाही गोंधळाचा धडा गिरविला. मंजूर, नामंजूरच्या घोषणांनी दीनानाथ नाट्यगृह दणाणून गेले होते. दोन टक्के लाभांश, नोकरभरती व जागा खरेदीच्या मुद्द्याला विरोधकांनी विरोध केला. पण सत्ताधारी समितीच्या सभासदांनी मंजुरीच्या घोषणा देत अर्ध्या तासातच सभा गुंडाळली. शिक्षक बँकेची सभा म्हणजे गोंधळ, हे समीकरण यंदाही कायम राहिले. गेल्या आठ दिवसांपासून दोन टक्के लाभांश व जागा खरेदीचा विषय गाजत होता. सत्ताधारी शिक्षक समिती व शिक्षक संघाचे शि. द. पाटील व संभाजीराव थोरात गटात आरोप-प्रत्यारोपाचा कलगीतुरा रंगला होता. त्यामुळे सभेत गोंधळ होणार, हे नक्की होते. सभेआधी अर्धा तास सभागृह खचाखच भरले होते. थोरात गटाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, अविनाश गुरव, सतीश पाटील यांनी सभागृहाबाहेरच फलक हाती घेत सत्ताधाऱ्यांच्या कारभाराविरोधात निदर्शने केली, तर शि. द. पाटील गट व बँक बचाव कृती समितीचे सभासद काळ्या फिती लावून सभागृहात दाखल झाले होते. सभा सुरू होण्यापूर्वीच आरोप-प्रत्यारोप सुरू होते. विरोधकांकडून वारंवार टिप्पणी होऊ लागल्याने समिती व संघाच्या सभासदांत वादावादी झाली. सभा सुरू झाल्यानंतर अध्यक्ष तुकाराम गायकवाड यांनी स्वागत केले. मुख्य कार्यकारी अधिकारी एन. आर. पाटील यांनी अहवाल वाचन केले. अहवाल वाचनावेळी सभासदांतून माईकची मागणी होऊ लागली. पण अध्यक्षांनी त्याकडे दुर्लक्ष करीत सभा सुरू ठेवली. याचवेळी व्यासपीठावर विनायक शिंदे, अविनाश गुरव या विरोधी संचालकांनीही सभासदांना माईक द्या, अशी मागणी केली. त्यातून सत्ताधारी व विरोधी संचालकांत बाचाबाची झाली. गेल्या सभेच्या इतिवृत्त वाचनात वीस मिनिटे घालविल्यानंतर अध्यक्ष गायकवाड यांनी माईकचा ताबा घेत अजेंड्यावरील विषयाचे वाचन सुरू केले. त्याला समितीच्या सभासदांनी मंजूर म्हणत प्रतिसाद दिला, तर विरोधी सभासदांनी विषयाला विरोध करीत व्यासपीठासमोर जमा झाले. तोपर्यंत उपाध्यक्ष महादेव माळी यांनी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि अध्यक्षांनी सभा संपल्याचे जाहीर केले. सभासदांनी प्रश्न विचारण्याची संधी द्या म्हणून गोंधळ घातला. तोपर्यंत सत्ताधारी संचालकांनी सभागृह सोडले होते. (प्रतिनिधी)कायदेशीर लढा देणार : विनायक शिंदेसभागृहात ८० टक्के सभासदांचा जागा खरेदी व लाभांश वाटपाला विरोध होता. त्यासाठीच सत्ताधाऱ्यांनी विषयाचे वाचन करीत सभा गुंडाळली आहे. सभासदांच्या एकही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. सभेत सत्ताधारी सभासदांनीच गोंधळ घातला. सत्ताधाऱ्यांच्या ठोकशाहीविरोधात आम्ही सहकार न्यायालयात कायदेशीर लढा देणार असून, निश्चित न्याय मिळेल, असे विरोधी संचालक विनायक शिंदे, अविनाश गुरव यांनी सांगितले. ...विरोधकांनीच गोंधळ घातला - सयाजीराव पाटीलसभा शांततेत पार पाडण्यासाठी अध्यक्षांनी वारंवार विनंती केली. पण विरोधकांनीच गोंधळ घातला. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी दर्शविली होती. विरोधी संचालकांनीच सभासदांना दंगा करण्यास उद्युक्त केले, असा आरोप समितीचे जिल्हाध्यक्ष सयाजीराव पाटील यांनी केला.