संजय गांधी निराधार याेजनेचा लाभ घ्या : संजय पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:26 IST2021-02-05T07:26:36+5:302021-02-05T07:26:36+5:30

तांदूळवाडी : शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ जास्तीतजास्त निराधार महिलांना मिळावा. यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत. ...

Take advantage of Sanjay Gandhi Niradhar Yojana: Sanjay Patil | संजय गांधी निराधार याेजनेचा लाभ घ्या : संजय पाटील

संजय गांधी निराधार याेजनेचा लाभ घ्या : संजय पाटील

तांदूळवाडी : शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ जास्तीतजास्त निराधार महिलांना मिळावा. यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत. पात्र लाभार्थ्यांनी तहसीलदार कार्यालयामध्ये याबाबतची माहिती घेऊन कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन संजय गांधी निराधार योजनेचे वाळवा तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी केले.

मालेवाडी (ता. वाळवा) येथे संजय गांधी निराधार योजनेच्या वाळवा तालुका अध्यक्षपदी निवडीबद्दल ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी आयाेजित केलेल्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. सरपंच मानसिंग परशुराम पाटील अध्यक्षस्थानी होते.

पाटील म्हणाले, तालुकास्तरावर विधवा, परित्यक्ता व निराधार तसेच अपंग महिलांसाठी पेन्शन योजना, घरकुल अशा अनेक योजना निर्माण केल्या आहेत. त्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. यासाठी तहसीलदार कार्यालयामध्ये प्रत्येक महिन्याला बैठक घेण्यात येते. बैठकीमध्ये कागदपत्रांची छाननी करून योजनेस पात्र की अपात्र, हे ठरवले जाते. तेव्हा अशा महिलांनी आपली कागदपत्रे योग्य प्रकारे असतील, याची खात्री करून सादर करावीत.

कार्यक्रमास उपसरपंच जालिंदर जाधव, माजी सरपंच रंगराव जाधव, राजेंद्र गुरव, प्रकाश एटम, ग्रामसेविका कविता यादव उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजारामबापू बँकेचे संचालक संभाजी आनंदराव पाटील यांनी केले. माजी सरपंच रंगराव जाधव शिरूलकर यांनी आभार मानले.

चौकट

कोराेनाकाळात लोकांमध्ये जनजागृतीचे काम करणाऱ्या डॉक्टर, आरोग्यसेवक, सेविका, शिक्षक, आशासेविका अंगणवाडीसेविका, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, अन्य कर्मचारी यांचा सत्कारही याप्रसंगी करण्यात आला.

Web Title: Take advantage of Sanjay Gandhi Niradhar Yojana: Sanjay Patil