शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणीचे दाखले न देणाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Updated: December 19, 2014 00:14 IST

मुस्लिम ओबीसी संघटनेचे निवेदन

कोल्हापूर : अल्पसंख्याक समाजातील मागास विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले जात पडताळणीसाठी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत, त्याची निर्गत का होत नाही याची चौकशी करून पात्र असूनही जात पडताळणीचे दाखले न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, यासह इतर अनेक मागण्यांचे निवेदन आज, गुरुवारी येथील आॅल इंडिया मुस्लिम ओबीसी आॅर्गनायझेशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत त्यांच्या कार्यालयाचे अप्पर चिटणीस दिलीप सावंत यांनी हे निवेदन स्वीकारले. जात पडताळणी कार्यालयाबाबतच्या काही गंभीर तक्रारी निवेदनात करण्यात आलेल्या आहेत. जात पडताळणी कार्यालयात मुस्लिम ओबीसी संघटनेचा एक प्रतिनिधी घ्यावा, महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या विशेष मागास प्रवर्ग(अ) नुसार प्रत्येक शैक्षणिक संस्थेत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक देखरेख समिती नेमावी, मुस्लिम समाजासाठी केंद्र व राज्य सरकारच्यावतीने अनेक सवलती व योजना जाहीर केलेल्या असतात; परंतु त्या समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत म्हणून अल्पसंख्याकांसाठीच्या सर्व समित्यांवर संघटनेचा प्रतिनिधी नेमावा, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक सवलती, उच्च शिक्षणाच्या योजना, शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षणाची अंमलबजावणी झाल्याबाबतची माहिती, अल्पसंख्याक समाजाला अर्थसाहाय्य करणाऱ्या संस्थांची माहिती, अब्दुल कलाम आझाद योजनेचे निकष, आदी बाबतची माहितीही संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात संघटनेचे जिल्हाध्यक्ष रफिक शेख, एम. एस. गवंडी, बापूसो मुल्ला, मेहताब मुल्ला, फिरोज अत्तार, सिकंदर मुजावर, अन्सार पटेल, अजित शेख, अस्लम खलिफा, रहिम सोलापुरे, बंकट थोडगे, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)