शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’ दरासाठी ‘स्वाभिमानी’चा ठिय्या

By admin | Updated: May 22, 2015 00:10 IST

इस्लामपूर तहसीलसमोर आंदोलन : शासन, कारखानदारांविरोधात शेतकऱ्यांकडून घोषणाबाजी

इस्लामपूर/शिराळा : ऊस उत्पादकांना मार्च, एप्रिलमध्ये गाळप झालेल्या उसाचे बिल न देणाऱ्या कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांपैकी बारा साखर कारखान्यांकडे एफआरपीनुसार २०४ कोटी रूपये शेतकऱ्यांचे थकित आहेत. या कारखान्यांनी गळीत हंगाम बंद झाल्यानंतरही बिल न दिल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. शेतकरी बिल मिळविण्यासाठी कारखाना प्रशासनाकडे फेऱ्या मारत आहेत. यामुळे एफआरपीनुसार दर न देणाऱ्या कारखान्यांवर फौजदारी कारवाई करून शेतकऱ्यांना सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी न्याय द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनांकडून होत आहे.संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी इस्लामपूर येथील तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीने कार्यालय परिसर दणाणून गेला होता. उसाची आधारभूत किंमत द्या, दूध दरात वाढ करावी यासह भूमी अधिग्रहण कायद्याबाबत शेतकरी हिताचे निर्णय करा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. दुपारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, भास्कर कदम, अ‍ॅड. एस. यु. संदे, भागवत जाधव, जयवंत पाटील, शहाजी पाटील, शिवाजीराव देसाई, गुंडाभाऊ आवटी, बाबासाहेब लादे, तानाजी साठे, बजरंग भोसले उपस्थित होते. (वार्ताहर)मिरजेत शेतकऱ्यांचे धरणे आंदोलनमिरज : उसाला हमीभाव व भूमी अधिग्रहण कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मिरजेत तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. उसाला एफआरपीप्रमाणे दर मिळावा, दूध दरात वाढ करावी, बँक, सोसायटीत घोटाळे करणाऱ्या आरोपींवर कठोर करवाई करावी, भूमी अधिग्रहण कायदा रद्द करावा आदी मागण्या करीत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. संभाजी मेंढे, बी. आर. पाटील, महावीर पाटील, संजीव खोलकुंबे, सुरेश माळी, आदिनाथ मोळे, प्रकाश सटाले, जयपाल चौगुले यांच्यासह शेतकरी धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलकांनी तहसीलदार किशोर घाडगे यांना मागण्यांचे निवेदन दिले.शिराळ्यात निषेधस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन करून शासन व साखर कारखानदारांचा निषेध व्यक्त केला. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखाने एफआरपीनुसार दर देत असतील तर सांगली जिल्ह्यातील का देत नाहीत, असा सवाल जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी उपस्थित केला. यावेळी राम पाटील, महादेव दिवे, बंडा नांगरे, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.