शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

द्राक्ष, बेदाणा उत्पादकांच्या मागणीसाठी 'स्वाभिमानी'चा चड्डी मोर्चा

By अशोक डोंबाळे | Published: June 08, 2023 6:33 PM

२० जूनपर्यंत निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

सांगली: द्राक्ष उत्पादकांना एकरी एक लाख आणि बेदाणा उत्पादकांना टनाला एक लाख रुपये अनुदान मिळावे, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या घरावर गुरुवारी चड्डी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी संचारबंदी असल्याचे सांगून मोर्चा रोखला. त्यानंतर आंदोलकांनी शासनाच्या विरोधात घोषणा देत तळपत्या उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान, खाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक घेऊन २० जूनपर्यंत निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

सांगलीच्या विश्रामबाग चौकातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्ह्यात संचारबंदी असल्यामुळे पालकमंत्री खाडे यांच्या घरावर मोर्चा काढू नये, अशी सूचना पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना दिली. त्यानुसार आंदोलकांनी आपला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळविला. चड्डी आणि बनियनवर शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात उतरले होते. द्राक्ष, बेदाणा उत्पादकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात येत होत्या. मोर्चाचे नेतृत्व स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले होते.

पालकमंत्री सुरेश खाडे यांनी आंदोलकांना २० जूनपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याबरोबर बैठक घेण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. तसेच लेखी पत्र पालकमंत्री खाडे यांचे प्रतिनिधी मोहन व्हनखंडे यांनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्याकडे दिले. त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.

आंदोलनात संजय खोलखुंबे, भरत चौगुले, उमेश मुळे, संजय बेले, राजेंद्र माने, रावसाहेब पाटील, सूरज पाटील,  सुरेश वासगडे, राजेंद्र पाटील, श्रीधर उदगावे, सुरेश घागरे, अनिल वाघ, नागेश पाटील, प्रभाकर पाटील, प्रकाश माळी, नागेश खामकर, रोहित वारे, जगन्नाथ भोसले, भरत पाटील, विनायक पवार, शांतीनाथ लिंबेकाई आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होते. पोलिसांकडून बळाचा वापर - महेश खराडेमहेश खराडे म्हणाले, जिल्ह्यात पोलिसी बळाचा वापर सुरू आहे. पोलिसांनी पालक मंत्र्याच्या घरावर काढण्यात येणाऱ्या मोर्चास परवानगी नाकारून संचारबंदीचा आदेश लागू केला. कितीही दहशतीचा वापर केला, तरी द्राक्ष व बेदाणा उत्पादकांना न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. द्राक्ष उत्पादकाला एकरी एक लाख आणि बेदाणा उत्पादकांना प्रतिटन एक लाख अनुदान मिळालेच पाहिजे. पालकमंत्री खाडे यांनी मुख्यमंत्री शिंदे व कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत बैठक घेण्यात येणार, असे आश्वासन दिले आहे. २० जूनपर्यंत निर्णय न झाल्यास बेमुदत आंदोलन छेडण्यात येणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना