Sangli ZP Election 2026: आमदारांचं ठरलं; माजी खासदारांचा सस्पेन्स कायम!, नाट्यमय घडामोडींची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 16:58 IST2026-01-27T16:57:53+5:302026-01-27T16:58:14+5:30

नेमके मैदानात कोण उतरणार? याची उत्सुकता कायम

Suspense continues between former MP Sanjaykaka Patil's Chinchani and Yelavee Zilla Parishad factions | Sangli ZP Election 2026: आमदारांचं ठरलं; माजी खासदारांचा सस्पेन्स कायम!, नाट्यमय घडामोडींची शक्यता

Sangli ZP Election 2026: आमदारांचं ठरलं; माजी खासदारांचा सस्पेन्स कायम!, नाट्यमय घडामोडींची शक्यता

दत्ता पाटील

तासगाव : जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारांना एबी फॉर्म देऊन अर्ज दाखल झाले. अर्ज माघारीसाठी मंगळवारचा एक दिवस हातात आहे. एबी फॉर्म मिळाल्यानंतर आमदार रोहित पाटील यांचे सर्व उमेदवार प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. मात्र, माजी खासदार संजयकाका पाटील यांचा चिंचणी आणि येळावी जिल्हा परिषद गटाचा सस्पेन्स कायम राहिला आहे. अर्ज माघारीपर्यंत या दोन गटांत नाट्यमय घडामोडींची शक्यता व्यक्त होत असून, नेमके मैदानात कोण उतरणार? याची उत्सुकता कायम आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत एरवी अर्ज दाखल झाल्यानंतर ज्या उमेदवाराला एबी फॉर्म दिला जाईल, तोच उमेदवार निश्चित मानला जात होता. मात्र, नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत माजी खासदार संजयकाका पाटील यांच्याकडून ऐनवेळी डमी उमेदवाराला एबी फॉर्म जोडण्यात आला आणि अर्ज माघारीच्या अखेरच्या क्षणी काही ठिकाणी उमेदवार बदलण्यात आले होते.

अर्थात, त्यांचा हा निर्णय योग्य ठरल्याचे निकालानंतर दिसून आले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर बहुतांश उमेदवार प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. आमदार रोहित पाटील यांचे जिल्हा परिषदेचे सहा आणि पंचायत समिती गणाचे बारा उमेदवार वेगवेगळ्या माध्यमांतून प्रचाराला लागले आहेत, तर माजी खासदार संजयकाका पाटील यांचेही चिंचणी आणि येळावीचा अपवाद वगळता अन्य जिल्हा परिषद गट आणि गणातील उमेदवार प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.

येळवी जिल्हा परिषद गटात माजी पंचायत समिती सदस्य उमेश पाटील यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म जोडला आहे. मात्र, याठिकाणी विकास आघाडीतील काँग्रेस आणि शरद पवार गट यांच्यात पेच आहे, तर रोहित पाटील गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांनीही बंडाचे निशाण उभारले आहे. आमदार गटात झालेल्या बंडखोरीचा फायदा करून घेण्यासाठी याठिकाणी संजयकाका गटाकडून अनपेक्षित निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.

दुसरीकडे चिंचणी जिल्हा परिषद गटात संजयकाकांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एबी फॉर्म जोडला आहे. त्यांच्याविरोधात असलेले, त्यांचे चुलत भाऊ अक्षय पाटील यांनी प्रचार करायला सुरुवात केली असली तरी प्रभाकर पाटील यांच्या उमेदवारीवर अद्याप शिक्कामोर्तब झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे याठिकाणीदेखील जिल्हा परिषद उमेदवारीचा सस्पेन्स कायम राहिला आहे.

Web Title : सांगली ZP चुनाव: विधायक तय, पूर्व सांसद का सस्पेंस बरकरार, नाटकीय घटनाक्रम की आशंका!

Web Summary : सांगली ZP चुनाव में विधायक रोहित पाटिल के उम्मीदवार प्रचार कर रहे हैं। पूर्व सांसद संजयकाका पाटिल ने चिंचनी, येलावी समूहों को सस्पेंस में रखा है। अंतिम तिथि से पहले अप्रत्याशित कदमों की आशंका है, जिससे अंतिम दावेदारों के बारे में अनिश्चितता बनी हुई है। सबकी निगाहें घटनाक्रम पर टिकी हैं।

Web Title : Sangli ZP Election: MLAs Finalized, Ex-MP's Suspense Remains, Dramatic Developments Expected!

Web Summary : Sangli ZP election sees MLA Rohit Patil's candidates campaigning. Ex-MP Sanjaykaka Patil keeps Chinchani, Yelavi groups in suspense. Unexpected moves are anticipated before the deadline, creating uncertainty about final contenders. All eyes are on the unfolding drama.