इचलकरंजीजवळ महिलेचा खून करून पळालेला संशयित सांगलीत जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 11:46 IST2024-01-10T11:46:09+5:302024-01-10T11:46:54+5:30
सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिलेचा खून करून दोन महिने फरारी असणाऱ्या सचिन ऊर्फ पोप्या माने ...

इचलकरंजीजवळ महिलेचा खून करून पळालेला संशयित सांगलीत जेरबंद
सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिलेचा खून करून दोन महिने फरारी असणाऱ्या सचिन ऊर्फ पोप्या माने (वय ३३, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, शासकीय रुग्णालयाजवळ, सांगली) याला विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केले. तो अट्टल गुन्हेगार असून, विश्रामबाग पोलिस ठाण्यातही त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. तो सांगलीत १०० फुटी रस्ता परिसरात येणार असल्याची खबर मिळाल्यावरून पोलिसांनी सापळा लावला.
इचलकरंजीजवळ २९ ऑक्टोबर २०२३ रोजी एका महिलेचा पोप्याने खून केला होता. याप्रकरणी त्याच्याविरोधात शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून तो गायब झाला होता. सांगलीत चोरी केल्याप्रकरणीही विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. १०० फुटी रस्त्यावर त्रिमूर्ती चौकात पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.