शेगाव येथे रविवारी ग्रामीण साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:30 IST2021-08-24T04:30:29+5:302021-08-24T04:30:29+5:30

जत : मराठी साहित्य सेवा मंच, डॉ. बलभीम मुळे स्मृती फाऊंडेशन व ओम साई प्रतिष्ठान, शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ...

Sunday Grameen Sahitya Sammelan at Shegaon | शेगाव येथे रविवारी ग्रामीण साहित्य संमेलन

शेगाव येथे रविवारी ग्रामीण साहित्य संमेलन

जत : मराठी साहित्य सेवा मंच, डॉ. बलभीम मुळे स्मृती फाऊंडेशन व ओम साई प्रतिष्ठान, शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शेगाव (ता. जत) येथील चिंच विसावा येथे २४ वे ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती साहित्य सेवा मंचचे अध्यक्ष किरण जाधव, मच्छिंद्र ऐनापुरे व लवकुमार मुळे यांनी दिली.

या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संपतराव जाधव असणार आहेत. यावेळी पहिल्या सत्रात दुपारी २ ते ३ यावेळेत कवी लवकुमार मुळे यांच्या ‘कवीने पिंजून घ्यावा भोवताल’ व कवी महादेव बुरुटे यांच्या ‘पिंपळपान डॉट कॉम’ या पुस्तकांचे प्रकाशन व अध्यक्षीय भाषण होणार आहे. नंतर ‘नव्या पिढीला वाचन संस्कृतीकडे कसे आणता येईल?’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. यात पत्रकार शिवराज काटकर, दिगंबर शिंदे, नामदेव भोसले सहभागी होणार आहेत.

तिसऱ्या सत्रात ‘श्रावणसर’ कवी संमेलन होणार आहे. इंद्रजित घुले (मंगळवेढा) हे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. संतोष जगताप (लोणविरे), ज्योतिराम फडतरे (वाटंबरे), रवी सांगोलकर, रशीद मुलाणी, रावसाहेब यादव, दिनराज वाघमारे, केशव सुर्वे, माणिक कोडग आदी कवी सहभागी होणार आहेत. या संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी विजय नाईक, मोहन माने-पाटील, कुमार इंगळे, समाधान माने उपस्थित होते.

Web Title: Sunday Grameen Sahitya Sammelan at Shegaon