शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
3
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
4
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
5
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
6
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
7
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
8
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
10
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
11
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
12
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
13
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
14
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
15
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
16
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
17
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
18
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
19
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
20
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
Daily Top 2Weekly Top 5

ऊस तोडीला अवकाळी पावसाचे ग्रहण

By admin | Updated: November 17, 2014 23:21 IST

कृष्णाकाठची स्थिती : किमान महिनाभर ऊस तोडी लांबणार

निवास पवार - शिरटे -विधानसभा निवडणूक, ऊस तोड कामगारांचे आंदोलन यामुळे २0१४—१५ चा गळीत हंगाम आधीच उशिरा सुरु झाला. त्यातच आता अवकाळी पावसाची भर पडली आहे. या अवकाळी पावसामुळे कृष्णा नदीकाठावरील गावांमध्ये किमान महिनाभर तरी ऊस तोड होऊ शकत नाही. याचा फटका शेतकरी वर्गाला बसणार आहे. एकूणच या पावसाचे ऊस तोडीला ग्रहण लागल्याची भावना शेतकरी वर्गातून आहे.नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कृष्णाकाठावरील काही कारखान्यांनी गळीत हंगामास सुरुवात केली. ऊस तोडीही सुरु झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यावर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाशिवाय गळीत हंगाम सुरू झाल्याने कारखानदारांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला होता. परंतु शेतकरी आणि कारखानदारांचा आनंद निसर्गाला मान्य नसावा, म्हणूनच की काय, गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सध्या कृष्णा नदीकाठावरील सर्व ऊस तोडी पूर्णपणे बंद करण्यात आल्या असून, अजून किमान महिनाभर तरी ऊस तोडता येणार नाही. यामुळे यंदाही गळीत हंगाम लांबण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.दरवर्षी आॅक्टोबर महिन्यात ऊस तोडणीचा कार्यक्रम सुरु होतो. नोव्हेंबर, डिसेंबरअखेर अनेक शेतकऱ्यांचा ऊस तुटून जातो. ऊस गेल्यानंतर अनेक शेतकरी त्यामध्ये गहू अथवा इतर पिके घेत असतो. परंतु गेल्या तीन ते चार वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दरासाठीच्या आंदोलनामुळे गळीत हंगाम लांबणीवर पडत गेला. यावर्षी संघटनेचे आंदोलन नसले तरी विधानसभा निवडणूक, ऊस तोडणी कामगारांचे काम बंद आंदोलन व आता अवकाळी पाऊस यामुळे याहीवर्षी हंगाम किमान दोन महिने लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.य. मो. कृष्णा सह. साखर कारखान्याचा अपवाद वगळता कृष्णाकाठावरील सर्वच कारखान्यांनी गळीत हंगामास सुरुवात केली आहे. ऊस तोड सुरु झाली आणि लगेचच अवकाळी पावसाचे थैमान सुरु झाल्याने काही ऊस तोडी निम्म्यावरच थांबवण्यात आल्या आहेत. आता तरी पावसाने विश्रांती घ्यावी, अशीच प्रार्थना करताना शेतकरी वर्ग दिसत आहे.माळरानाला कमी फटका..!ज्या शेतकऱ्यांची ऊसशेती माळरानावर आहे, त्यांना या पावसाचा फारसा फरक पडत नाही. पाऊस पडून गेल्यानंतर दोन दिवसात पुन्हा ऊस तोडणी केली तरी चालू शकते. परंतु कृष्णाकाठावरील ऊसशेती बाराही महिने पाण्याखाली असल्याने येथे थोडा पाऊस झाला तरी ८ ते १0 दिवस उसात जाता येत नाही. गेले चार दिवस तर मुसळधार पाऊस पडल्याने किमान महिनाभर तरी तोडी घेता येणार नाहीत.