रस्त्यावर सुरक्षेचे नियम तंतोतंत पाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:27 IST2021-02-05T07:27:24+5:302021-02-05T07:27:24+5:30

कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर करखाना कार्यस्थळावर रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त ऊस वाहतूक ...

Strictly follow the rules of the road | रस्त्यावर सुरक्षेचे नियम तंतोतंत पाळा

रस्त्यावर सुरक्षेचे नियम तंतोतंत पाळा

कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर करखाना कार्यस्थळावर रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, शासकीय पातळीवर हा सप्ताह सुरू केला आहे. वाहन चालविताना दारू पिऊन गाडी चालवू नका, ठराविक वेगानेच वाहन चालवा. चुकीच्या बाजूने वाहन ओलांडू नये, सीटबेल्टचा वापर करा, ट्रॅक्टरमध्ये ध्वनिक्षेपक मोठ्या आवाजात लावू नयेत, रिफ्लेक्टरशिवाय वाहन रस्त्यावर आणू नये, वाहन रस्त्यामध्ये उभे करू नये, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

जिल्हा परिषद सदस्य शरद लाड म्हणाले, कारखान्‍याने शून्‍य अपघात योजनेखाली स्‍थापनेपासून काळजी घेतली आहे. यातून जो ट्रॅक्‍टर चालक नियमांचे पालन करीत नाही त्‍याच्‍यावर कारवाईही केली जाते. कारखान्यावर येणाऱ्या प्रत्येक वाहनाला पूर्वीपासूनच रिफ्लेक्टर लावण्यात आले आहेत.

यावेळी कुंडल पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक संगीता माने, कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे, सचिव अप्पासाहेब कोरे, वसंत लाड, अधिक थोरबोले, प्रदीप लाड, लेबर ऑफिसर वीरेंद्र देशमुख यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

फोटो-२७कुंडल१

Web Title: Strictly follow the rules of the road