शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

भांडणापेक्षा म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी ताकद लावावी

By admin | Updated: May 21, 2015 00:03 IST

निवृत्ती शिंदे : जत तालुक्यातील भाजप-काँग्रेसच्या नेत्यांना टोला

उमदी : जत तालुक्यातील कॉँग्रेस व भाजपच्या नेत्यांमध्ये सुरू असलेला वादविवाद थांबवून दोन्ही नेत्यांनी टीकेसाठी ताकद न लावता, म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी ती लावली, तर पुण्य लागेल. ‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी संघर्ष समितीतर्फे आयोजित उमदी-सांगली पदयात्रेला दोन्ही नेत्यांनी पाठिंबा देऊन सहभागी होणे गरजेचे आहे, असे मत तालुका पाणी संघर्ष समितीचे नेते निवृत्ती शिंदे (सरकार) यांनी व्यक्त केले.तालुका पाणी संघर्ष समितीच्या उमदी-सांगली पदयात्रेसंदर्भात आयोजित बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार, अनिल शिंदे, महम्मद कलाल, कांतप्पा शिंदे, मानसिध्द पुजारी, मलाय्या मठपती, दशरथ चव्हाण उपस्थित होते. शिंदे म्हणाले की, जत तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. कायमस्वरूपी पाण्यासाठी आमदार विलासराव जगताप, कॉँग्रेसचे नेते विक्रम सावंत, सुरेश शिंदे, प्रकाश जमदाडे, पी. एम. पाटील, माजी आ. सनमडीकर, मा. आ. प्रकाश शेंडगे, जनस्वराज पक्षाचे नेते बसवराज पाटील या नेत्यांनी मोर्चा काढून जनआंदोलनकेले आहे. अनेक निवडणुकीत एकमेकाविरूध्द अनेकदा टीका झाली आहे.  मात्र जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीनंतर एकमेकांविरुध्द अत्यंत खालच्या दर्जाची टीका करणे ही दुर्दैवी बाब आहे. सध्या तालुका भीषण पाणी टंचाईला सामोरा जात आहे. पिण्याच्या पाण्याची व चाराटंचाई भासत आहे. अशा स्थितीत टीका थांबवून विकासात्मक कामे करणे आवश्यक आहे. तालुका पाणी संघर्ष समितीने २३ जानेवारी २०१४ रोजी प्राणांतिक उपोषण केले. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी उपोषणास पाठिंबा दिला होता. उपोषणावेळी शासनाने दीड वर्षात पाणी देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. २३ जून २०१५ रोजी दीड वर्षे पूर्ण होत आहे. मात्र शासनाची ‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी काहीच हालचाल दिसत नाही. त्यामुळे संघर्ष समितीने १७ जूनपासून ‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी उमदी-सांगली पदयात्रा आयोजित केली आहे, असे शिंदे म्हणाले. (वार्ताहर)