शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
7
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
8
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
9
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
10
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
11
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
12
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
13
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
14
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
15
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
16
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
17
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
18
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
19
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
20
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
Daily Top 2Weekly Top 5

शाळांचे राष्ट्रीयीकृत बँक खाते बदल थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:27 IST

सांगली : समग्र शिक्षा अभियानांतर्गत सध्या शाळांची राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खाती सुरू असून, ती दुसऱ्या राष्ट्रीयीकृत बँकेत उघडण्यासाठी सक्ती करण्यात ...

सांगली : समग्र शिक्षा अभियानांतर्गत सध्या शाळांची राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खाती सुरू असून, ती दुसऱ्या राष्ट्रीयीकृत बँकेत उघडण्यासाठी सक्ती करण्यात येऊ नये, तसेच प्रत्यक्ष शाळा सुरू असल्याने लसीकरणासह कोविड कामकाजावरील शिक्षकांचे सर्व आदेश रद्द करण्यात यावेत, अशी मागणी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांच्याकडे केली आहे.

शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सदस्य बाबासाहेब लाड, मिरज तालुका अध्यक्ष सुरेश नरुटे, सरचिटणीस प्रकाश कलादगी, विकास चौगुले, दिलीप पाटील, शंकर भोसले यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी कांबळे यांच्या सोबत शिक्षण आणि शिक्षकांच्या प्रश्नावर चर्चा केली.

यावेळी लाड यांनी समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळांची राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खाती सुरू आहेत, ती बंद करून बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत खाते उघडण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या दि. २२ जून २०२१ परिपत्रकानुसार जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र बँकेत नव्याने शाळांची खाती उघडण्यासाठी सूचना दिली आहे. याचा मुख्याध्यापकांना नाहक त्रास होत आहे. फक्त जत तालुक्यात सहा शाखा असून, शिराळा, खानापूर या तालुक्यांत प्रत्येकी एक शाखा आहे. आटपाडी, वाळवा, मिरज, तासगाव, पलूस तालुक्यांत प्रत्येकी दोन शाखा आहेत. त्यामुळे वाडी-वस्तीवरील, खेड्यातील शाळा प्रमुखांना गरज नसताना सुरू असणारी बँक खाती बंद करून प्रशासनाने एकाच बँकेत खाती उघडण्यासाठी सक्ती करू नये, अशी विनंती केली आहे. जिल्ह्यातील शाळा विद्यार्थी उपस्थितीसह नियमित सुरू असल्याने माध्यान्ह भोजन सुरू करणे, शिक्षकांना कोविड कामकाजातून मुक्त करण्यासह अन्य प्रलंबित प्रश्नांबाबत विस्तृत चर्चा केली. मुख्याध्यापक पदोन्नतीमुळे शिक्षकांचे समायोजन करणे, कन्नड विभागातील वरिष्ठ मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांची रिक्त पदे भरणे, ऑगस्ट २०१४ मधील नियुक्त विषय शिक्षकांना रुपये ४३०० ग्रेड वेतन लागू करणे इत्यादी प्रश्नांबाबत शिक्षणाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचेही लाड यांनी सांगितले.

यावेळी शिक्षक नेते किरण गायकवाड, सयाजीराव पाटील, शशिकांत भागवत, जिल्हा सरचिटणीस दयानंद मोरे, सतीश पाटील, कार्यकारी अध्यक्ष उद्धव शिंदे, कोषाध्यक्ष माणिक पाटील, शिक्षक बँकेचे अध्यक्ष यू. टी. जाधव, राजाराम सावंत, शिवाजी पवार, शशिकांत बजबळे, सुनील गुरव, महादेव माळी, श्रेणिक चौगुले आदी उपस्थित होते.