शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील विभुतवाडीत शिंदेसेनेच्या प्रचार वाहनावर दगडफेक, आटपाडी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 19:07 IST

कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याची पोलिसांत तक्रार

आटपाडी : तालुक्यातील विभुतवाडी येथे निवडणूक प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या प्रचार वाहनावर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विभुतवाडी बसस्थानकाजवळ ही घटना घडली. याबाबत हेमंत तुकाराम मोटे (वय २५, व्यवसाय नोकरी, रा. विभुतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हेमंत मोटे हे सदर ठिकाणी उभे असताना शिंदेसेनेच्या वतीने प्रचारासाठी वापरण्यात येणारे वाहन तेथे उभे होते. संबंधित वाहनाचा चालक जवळच चहा पिण्यासाठी गेला होता. त्याचवेळी काही अंतरावर भाजप पक्षाच्या वतीने प्रचार सुरू होता.

याचदरम्यान एक अनोळखी इसम फिर्यादीजवळ येऊन शिंदेसेनेच्या प्रचार वाहनाच्या स्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगू लागला. त्यावर फिर्यादीने वाहन चालक चहा पिण्यास गेला असल्याचे सांगितले. यानंतर अचानकपणे त्याठिकाणी दोन वाहने आली. या वाहनांतून ३ ते ४ अनोळखी व्यक्ती उतरल्या. त्या व्यक्तींनी शिवसेनेच्या प्रचार वाहनावर दगडफेक करत वाहनाच्या काचा फोडल्या. या दगडफेकीत प्रचार वाहनाचे अंदाजे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.दरम्यान, घडत असलेली घटना फिर्यादी हेमंत मोटे हे आपल्या मोबाइलमध्ये शूट करत असताना, त्यातील दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या हाताला धरून त्यांना बाजूला ओढले व धक्काबुक्की केली. त्यावेळी शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करत फिर्यादीला सुरक्षित ठिकाणी नेले. या घटनेनंतर शिंदेसेना कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, निवडणूक प्रचारादरम्यान अशा प्रकारच्या हिंसक घटनांचा तीव्र निषेध केला आहे. निवडणूक काळात शांतता राखणे आवश्यक असताना अशा प्रकारची दगडफेक व धक्काबुक्की ही लोकशाहीला काळिमा फासणारी असल्याची प्रतिक्रिया शिंदेसेना पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Stone pelting on Shinde Sena's vehicle in Sangli, case filed.

Web Summary : During election campaigning in Sangli's Vibhutwadi, Shinde Sena's vehicle was attacked with stones. An unidentified person asked to reduce the speaker volume, followed by the arrival of individuals who vandalized the vehicle. A case has been registered at Atpadi police station.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस