शिराळा तहसीलदारांना छावा संघटनेचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:27 IST2021-02-05T07:27:35+5:302021-02-05T07:27:35+5:30

शिराळा : शिराळा तालुका छावा मराठा संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार गणेश शिंदे यांना देण्यात आले. तहसील कार्यालयामध्ये मुख्य ...

Statement of Chhawa Association to Shirala Tehsildar | शिराळा तहसीलदारांना छावा संघटनेचे निवेदन

शिराळा तहसीलदारांना छावा संघटनेचे निवेदन

शिराळा : शिराळा तालुका छावा मराठा संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार गणेश शिंदे यांना देण्यात आले.

तहसील कार्यालयामध्ये मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूस बाहेरील सजात तालुक्यातील लोकांसाठी मदत कक्ष करावा. प्रत्येक अधिकाऱ्याच्या पाठीमागे त्यांचे नाव मोबाईल नंबर व पदभार हे मराठीत लिहिलेले असावे. सेतू कार्यालयात लेखी दरपत्रक लावणे बंधनकारक आहे. मुद्रांक नोंदणी व दस्त कार्यालयामध्ये कार्यालयाबाहेर शेती खरेदी-विक्री व प्लॉट खरेदी-विक्रीविषयक शासकीय दरपत्रक लिहावे. खरेदी-विक्रीचा नमुना लिहावा, आदी मागण्या करण्यात आल्या.

यावेळी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संघटक संदीप कदम, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा सविता दमामे, सांगली जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब कदम, उपाध्यक्ष शरद नायकवडी, सरचिटणीस रवींद्र पवार, शिराळा तालुका अध्यक्ष पोपट पाटील, उपाध्यक्ष राजाभाऊ चरणकर, सचिव दिलीप कदम, सल्लागार कृष्णाजी कदम, सदस्य रमेश पाटील, संजय कदम, वाळवा तालुका अध्यक्ष उर्मिला पाटील, अनिल आंबर्डेकर आदी उपस्थित होते.

फाेटाे : २५ शिराळा १

Web Title: Statement of Chhawa Association to Shirala Tehsildar