सांगलीत व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीचे नीट परीक्षा केंद्र सुुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:25 AM2021-04-17T04:25:24+5:302021-04-17T04:25:24+5:30

सांगली : एनटीएच्यावतीने घेतली जाणारी नीट परीक्षा जिल्ह्यातील १० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी देतात. परीक्षेसाठी त्यांना अन्य जिल्ह्यांत जावे लागते. ...

Start a proper examination center for vocational courses in Sangli | सांगलीत व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीचे नीट परीक्षा केंद्र सुुरू करा

सांगलीत व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीचे नीट परीक्षा केंद्र सुुरू करा

Next

सांगली : एनटीएच्यावतीने घेतली जाणारी नीट परीक्षा जिल्ह्यातील १० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी देतात. परीक्षेसाठी त्यांना अन्य जिल्ह्यांत जावे लागते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व जिल्ह्यातील परीक्षार्थींची मोठी संख्या पाहता नीट परीक्षेचे केंद्र सांगलीत करण्याची मागणी जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष ॲड. अमित शिंदे यांनी केली आहे.

ॲड. शिंदे यांनी सांगितले की, या परीक्षेतून एमबीबीएस, बीडीएस यासह आयुष विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो. व्हेटर्नरी शिक्षणक्रम, शासकीय, अनुदानित व खासगी महाविद्यालयांतील बीपीटीएच, बीपीओ, बीएएसपीएल, बीएससी नर्सिंगच्या प्रवेशासाठीही परीक्षा आवश्यक आहे. जिल्ह्यात ८ अभियांत्रिकी, ३ एमबीबीएस, २ बीडीएस, ३ बीएएमएस, ३ बीएचएमएस तसेच फार्मसी, आर्किटेक्चर महाविद्यालये आहेत. त्यांच्याशी संबंधित अनेक महत्त्वाच्या परीक्षा जिल्ह्यात होतात. एकूण १४८ महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी कोल्हापूर, पुण्याला जावे लागते.

ॲड. शिंदे यांनी यासाठी नीटच्या संचालकांशी पत्रव्यवहार केला आहे. पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजय पाटील व जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनीही पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. यावेळी डाॅ. विशाल मगदूम उपस्थित होते.

निवेदनावर ॲड. अरुणा शिंदे, अमित पंडित, डाॅ. कल्याणी जगदाळे-बावचकर, प्रा. योगेश पाटील, संभाजी पोळ, किरण एरंडोले, प्रा. रोहित कुंभारकर यांच्याही सह्या आहेत.

चौकट

वीस हजारांवर विद्यार्थी

सध्या कोरोना व लॉकडाऊन काळात हा प्रवास धोकादायक आहे. गेल्यावर्षीही परीक्षेला हजर राहण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले होते. हे पाहता सांगली जिल्ह्यातच परीक्षा केंद्रे सुरू करणे सर्वांसाठी योग्य व सुरक्षित ठरणार आहे. सुमारे १० हजारांहून अधिक विद्यार्थी यंदा परीक्षेला बसतील असा अंदाज आहे. शेजारच्या कोल्हापूरमधील काही शहरांतूनही विद्यार्थी सांगलीला येऊ शकतात, त्यामुळे त्यांची संख्या २० हजारांवर जाऊ शकते. त्यांच्यासाठी सांगली हे केंद्र सोयीचे ठरेल.

Web Title: Start a proper examination center for vocational courses in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.