मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाळव्यात उत्स्फूर्त स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 10:09 IST2017-11-25T10:09:18+5:302017-11-25T10:09:37+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाळवा येथील डॉ. नागनाथ नायकवडी सहकारी साखर कारखाना हेलिपॅडवर उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाळव्यात उत्स्फूर्त स्वागत
सांगली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाळवा येथील डॉ. नागनाथ नायकवडी सहकारी साखर कारखाना हेलिपॅडवर उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी सहकार मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, वाळव्याचे उप विभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, वाळव्याचे तहसिलदार नागेश पाटील, पृथ्वीराज देशमुख, वैभव नायकवडी यांची प्रमुख उपस्थिती होती.