Sangli Crime: पत्नीला सासरी पाठवत नसल्याने जावयाचा सासऱ्यावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 16:38 IST2023-02-17T16:37:30+5:302023-02-17T16:38:04+5:30

मध्यस्थी दोन चांगली माणसे घेऊन ये. मग मुलीला सासरी पाठवतो, अशी अट घातली

Son in law attack on father in law in sangli | Sangli Crime: पत्नीला सासरी पाठवत नसल्याने जावयाचा सासऱ्यावर हल्ला

संग्रहीत छाया

संख : लाकडेवाडी (ता. जत) येथे पत्नीला सासरी नांदवण्यास पाठवत नाही म्हणून दारुड्या जावयाने सासऱ्यावर चाकू हल्ला करून त्याला जखमी केले. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली.

महादेव रावबा बंडगर (वय ४२, रा. लाकडेवाडी) याचे गावातीलच महादेव मरगू पडोळकर यांच्या मुलीशी विवाह झाला आहे. बंडगर याला दारूचे व्यसन आहे. त्यामुळे त्याची पत्नी माहेरी राहायला आली होती. पतीकडे नांदण्यास जाण्याची तिची तयारी नव्हती. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास पडोळकर त्यांची पत्नी शीलाबाई, मुलगी आनंदी असे आपल्या घरासमोरील अंगणात बसले होते. 

यावेळी जावई बंडगर दारू पिऊन तेथे आला. तुम्ही तुमच्या मुलीला माझ्याबरोबर नांदण्यास पाठवा, असे तो म्हणाला. दमदाटी केली. शिवीगाळ केली. सासरे पडोळकर यांनी दोन चांगली माणसे मध्यस्थी म्हणून घेऊन ये. मग मुलीला सासरी पाठवतो, अशी अट घातली. तेव्हा जावई सासऱ्याच्या अंगावर धावून गेला. त्यांच्यात झटापट झाली. जावयाने चाकूचा वार सासऱ्याच्या पोटावर केला. यात ते जखमी झाल्याचे पाहून जावई बंडगर यांनी तेथून पलायन केले.

Web Title: Son in law attack on father in law in sangli