शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर मतदारसंघातून विधान परिषदेसाठी फिल्डिंग; भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 16:34 IST

त्याअगोदरच रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांची विधान परिषदेवर नियुक्ती झाली

अशोक पाटीलइस्लामपूर : जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या समर्थकांवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. दुसरीकडे मात्र भाजप आणि राष्ट्रवादीतील काही नेते विधान परिषदेवर जाण्यासाठी आक्रमक झाले आहेत. इच्छुक नेत्यांनी आपल्या मुंबई वाऱ्या वाढविल्या आहेत. भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्याकडे आमदारकीची फिल्डिंग लावली आहे.विधानसभा निवडणुकीत निशिकांत पाटील यांनी थेट आ. जयंत पाटील यांच्यापुढे आव्हान उभे केले. याचाच सारासार विचार करता निशिकांत पाटील यांना विधान परिषदेवर घेण्यासाठी त्यांच्या समर्थकांकडून प्रयत्न केले जात असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. या उलट अजित पवार यांचे स्नेही राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष केदार पाटील आणि एन. डी. शुगरचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील यांनी यापूर्वीच विधान परिषदेसाठी अजित पवार यांच्याकडे साकडे घातले होते.दत्ताजीराव पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघात शैक्षणिक संस्था आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एन. डी. शुगर औद्योगिक कारखाना उभा केला आहे. याला केदार पाटील यांची साथ आहे. २०१४ साली पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवार म्हणून दत्ताजीराव पाटील यांच्या नावाची चर्चा अजित पवार यांच्या गटात होती; परंतु सारंग पाटील यांचे नाव पुढे आले. त्यामुळे अरुणअण्णा लाड यांनी बंडखोरी केली. लढतीमध्ये भाजपचे चंद्रकांतदादा पाटील निवडून आले. तेव्हापासून दत्ताजीराव पाटील अजित पवार गटातून कार्यरत आहेत. त्यांच्याबरोबर वाळवा तालुकाध्यक्ष केदार पाटीलही सक्रिय आहेत. एकंदरीत सध्या तरी इस्लामपूर मतदारसंघातून विधान परिषदेसाठी नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे.घड्याळाची मुसंडीजयंतरावांच्या बालेकिल्ल्यात भाजप आणि राष्ट्रवादीने मुसंडी मारली आहे. शिराळा मतदारसंघातून सम्राट महाडिक, तर इस्लामपूर मतदारसंघातून तिघेजण विधान परिषदेवर जाण्यास इच्छुक आहेत. त्याअगोदरच रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांची विधान परिषदेवर नियुक्ती झाली आहे.

अजित पवार यांचे आम्ही कट्टर समर्थक आहोत. केदार पाटील यांच्यावर तालुक्याची जबाबदारी दिली. २०१४ साली मला पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी मिळणार होती. झालेल्या विधानसभा निवडणुकीत केदार पाटील यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर होते. वरिष्ठ पातळीवरून निशिकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे विधान परिषदेवर मला किंवा केदार पाटील यांनाच संधी मिळावी, अशी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. - दत्ताजीराव पाटील, अध्यक्ष, एन. डी. शुगर इस्लामपूर.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारMLAआमदारVidhan Parishadविधान परिषद