सोने पॉलिशच्या बहाण्याने गंडा
By Admin | Updated: August 3, 2014 01:49 IST2014-08-03T01:29:38+5:302014-08-03T01:49:09+5:30
आष्ट्यातील प्रकार : महिलेला दीड लाखाला फसविले

सोने पॉलिशच्या बहाण्याने गंडा
आष्टा : येथील सौ. शोभा दत्तात्रय कदम (वय ५८) या विवाहितेस दागिने पॉलिश करून देतो म्हणून १ लाख ६५ हजारास फसविल्याची फिर्याद आष्टा पोलिसात देण्यात आली.
आष्टा येथी दत्त वसाहत येथील शोभा कदम या सकाळी ११ च्या दरम्यान देवपूजा करून घरात जात असताना सुमारे २५ ते ३० वयोगटातील एक तरुण आला व त्याने तांबा, पितळ, साने चांदीच ीभांडी, दागिने पॉलिश करून मिळतील, असे सांगितले. पती दत्तात्रय कदम किराणा दुकान उघडण्यास गेल्याने शोभा या घरी एकट्याच होत्या. प्रथम त्यांनी लक्ष दिले नाही. मात्र देवपूजेचा तांब्याचा तांब्या पॉलिश करून देतो असे सांगितले व तो चकाचक पॉलिश करून दिला. त्यानंतर त्याने तुमच्याकडे सोन्याच्या बांगड्या आहेत का असे विचारले. शोभा यांनी त्या हातातून निघत नसल्याचे सांगितल्यावर भामट्याने त्याच्याकडील लिक्विड लावून बांगड्या व पाटल्या काढल्या त्या वाटीत ठेवल्या. प्रथम कुकर आणण्यास सांगितले. कुकरमध्ये पाणी ओतले व त्यात बांगड्या टाकून कुकरचे झाकण लावण्यास सांगितले व २० मिनिटांनी ३ शिट्ट्या झाल्यावर कु कर उघड्यास सांगितले. तोपर्यंत शेजारी ठेवलेल्या घरातील कुकर पाहून येतो, असे सांगितले. थोड्या वेळाने पाहिले असता ६ तोळ्याच्या ९० हजाराच्या बांगड्या व ५ तोळ्याच्या ७५ हजाराच्या पाटल्या असा १ लाख ६५ हजारांचे सोन्याचे दागिने घेऊन भामट्याने पोबारा केल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आष्टा पोलिसात धाव घेतली. (वार्ताहर)