शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्‍याच्‍या कौशल्‍यापुढे परिस्‍थितीही नतमस्‍तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:22 IST

अशुतोष कस्‍तुरे पलूस : कुस्तीसाठी महिलांना दिलेला पहिला शिवछत्रपती पुरस्‍कार विजेत्या कौशल्‍या वाघ रायगाव (ता. कडेगाव) येथे महिलांसाठी ...

अशुतोष कस्‍तुरे

पलूस : कुस्तीसाठी महिलांना दिलेला पहिला शिवछत्रपती पुरस्‍कार विजेत्या कौशल्‍या वाघ रायगाव (ता. कडेगाव) येथे महिलांसाठी तालीम उभी करत आहेत. ही तालीम महाराष्‍ट्रातील एका महिलेने महिलांसाठी उभी केलेली पहिलीच तालीम असेल.

कौशल्‍या वाघ यांच्‍या घराला कुस्‍तीची मोठी परंपरा, परंतु परिस्‍थिती हलाखीची असल्‍याने वडील कृष्‍णात वाघ मुंबईत कामासाठी गेले. तेथील मानखुर्द येथे दहा बाय दहाची तालीम बांधली. कौशल्‍या यांनी घरचीच तालीम असल्‍याने १९९८ पासून कुस्‍तीचे धडे घेण्यास सुरुवात केली. यात्रांमधील मैदानांमध्‍ये चुणूक दाखवली. जगमलसिंग यांनी त्‍यांना मुंबईतील महिलांच्या पहिल्या संघातून २००२ मध्ये खेळविले. त्‍यांनी राष्‍ट्रीय पातळीवर महाराष्‍ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. २००५ ला पुण्‍यातील सबज्‍युनिअर स्‍पर्धेतही सुवर्णपदक कमावले. २००६ ला बँकॉकमधील आंतरराष्‍ट्रीय स्‍पर्धेमध्‍ये महिलांमधून पहिले रौप्‍यपदक महाराष्‍ट्राला मिळवून दिले. २०१२ मध्‍ये उत्‍तर प्रदेश येथे पहिले रौप्‍यपदक मिळवले. दरम्यान, गुडघ्‍याच्या लिगामेंटची तीनवेळा, तर खांद्याची एकदा शस्त्रक्रिया झाली. दुखापतीमुळे ऑलिम्पिकमध्‍ये खेळू शकल्‍या नाहीत.

२०१५ ला कुन्‍नूर (केरळ) येथील राष्‍ट्रीय स्‍पर्धेमधून महाराष्‍ट्राला कांस्‍यपदक मिळवून दिले. यावेळी रेल्‍वेकडून नोकरीही मिळाली; पण वयाच्‍या अडचणीमुळे मुकावे लागले.

२०१६ ला शिवछत्रपती पुरस्‍कार प्राप्‍त झाला. हा पुरस्‍कार मिळविणाऱ्या कौशल्‍या महाराष्‍ट्रातील पहिल्‍या महिला कुस्‍तीगीर होत्‍या. नंतर त्‍यांनी पतियाळा (पंजाब) येथे एनआयएस प्रशिक्षण घेतले. २०१८ ला अकलूज येथील ताराराणी कुस्‍ती केंद्रात महिलांसाठी कुस्‍ती प्रशिक्षक म्‍हणून काम केले; पण ही नोकरी जेमतेम वर्षभर केली. कौशल्‍या यांना राष्‍ट्रीय पातळीवरील पाच सुवर्ण, चार रौप्‍य, चार कांस्‍यपदके मिळाली आहेत, तर आंतराष्‍ट्रीय स्‍तरावरील एक पदक पटकावले आहे. ‘दंगल गर्ल’ बबिता फोगट, रितू फोगट यांनाही चितपट केले आहे.

आपल्‍या भागातील मुलींनी या क्षेत्रात येण्‍यासाठी तालीम बांधण्‍याचे स्‍वप्‍न त्‍यांनी पाहिले. खासदार संजयकाका पाटील, राज्‍यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम, जिल्‍हा परिषद सदस्‍य शरद लाड यांनी तालीम बांधण्‍यास मदत केली; पण अतिवृष्‍टीमध्‍ये तालमीचे बांधकाम मोडून पडले. न खचता त्‍यांनी पुन्‍हा बांधकाम सुरू केले. वेळप्रसंगी सोनेही गहाण ठेवले; पण आजवर काम बंद पडू दिले नाही.

कौशल्‍या यांचे काही महिन्‍यांपूर्वीच आटके (ता. कऱ्हाड) येथील सागर पाटील यांच्‍याशी लग्न झाले. तेही याच क्षेत्रातील असल्‍याने तालीम उभी करण्यासाठी सहकार्य लाभत आहे.