Sangli: भावाच्या भेटीआधीच बहिणीवर काळाचा घाला; रस्ता ओंलाडताना दुचाकीची धडक, उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 12:56 IST2025-05-13T12:54:58+5:302025-05-13T12:56:09+5:30
आष्टा : आष्टा - सांगली मार्गावर भावाला भेटायला जाताना रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला दुचाकीने धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी ...

Sangli: भावाच्या भेटीआधीच बहिणीवर काळाचा घाला; रस्ता ओंलाडताना दुचाकीची धडक, उपचारादरम्यान मृत्यू
आष्टा : आष्टा - सांगली मार्गावर भावाला भेटायला जाताना रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला दुचाकीने धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या पार्वती सदाशिव माने (वय ५८, रा. पोखले, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) यांचा मृत्यू झाला. ही घटना ७ मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत आष्टा पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सात मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पार्वती माने या चव्हाणवाडी आष्टा येथील कृष्णा जानकर या भावाला भेटायला निघाल्या होत्या. आष्टा - सांगली रस्ता ओलांडून त्या आपल्या भावाच्या घराकडे येत असताना दुचाकी क्रमांक (एम.एच. ०९ डी.जी. ७९९२) वरील चालक मोरेश्वर अण्णाप्पा महंकाळे याने त्यांना जोराची धडक दिली. यात त्या गंभीर जखमी झाल्या.
मोरेश्वर महंकाळे याने अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला. डोक्याला जोरदार मार लागल्याने त्यांना सांगली येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना पार्वती माने यांचे निधन झाले. भावा- बहिणीची भेट होण्याअगोदरच काळ आला. पार्वती माने यांचे बंधू कृष्णा बाबू जानकर (रा. आष्टा) यांनी दुचाकी चालक मोरेश्वर अण्णाप्पा महंकाळे (रा. डांगे कॉलेज मागे, आष्टा) याच्या विरुद्ध आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास आष्टा पोलिस करीत आहेत.