उपजिल्हा रुग्णालयात कोविशिल्ड लसीचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:28 IST2021-04-09T04:28:22+5:302021-04-09T04:28:22+5:30

इस्लामपूूर : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी गेल्या काही दिवसांत वाळवा तालुक्यात चाचण्या घेण्यासह लसीकरणाची मोहीम वेगाने राबविली ...

Shortage of Covishield vaccine in sub-district hospital | उपजिल्हा रुग्णालयात कोविशिल्ड लसीचा तुटवडा

उपजिल्हा रुग्णालयात कोविशिल्ड लसीचा तुटवडा

इस्लामपूूर : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी गेल्या काही दिवसांत वाळवा तालुक्यात चाचण्या घेण्यासह लसीकरणाची मोहीम वेगाने राबविली गेली. उपजिल्हा रुग्णालयासह शहरामध्ये आठ खासगी रुग्णालयांत लसीकरणाची व्यवस्था आहे. मात्र, उपजिल्हा रुग्णालयात लसीचा तुटवडा आल्याने तेथील लसीकरण बंद आहे. तसेच खासगी रुग्णालयांत लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांनी पाठ फिरविली आहे.

वाळवा तालुक्यात आतापर्यंत ३८ हजार ७७६ व्यक्तींना कोरोना प्रतिबंधित लस टोचण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालयाप्रमाणेच खासगी रुग्णालयांतही नाममात्र २५० रुपयांचे शुल्क आकारून लसीकरण केले जात आहे. मात्र बहुतांश नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात मोफत लसीकरण करून घेण्यास प्राधान्य दिले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून उपजिल्हा रुग्णालयात लसीचा तुटवडा जाणवू लागल्याने तेथील लसीकरणाचे काम थांबले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी खासगी केंद्रांवर जाऊन लसीकरण करून घेणे गरजेचे असताना त्याकडे मात्र त्यांनी पाठ फिरविली आहे. येत्या एक-दोन दिवसांत कोविशिल्ड लसीचा साठा उपलब्ध होईल. त्यानंतर पुन्हा हे लसीकरणाचे काम सुरू केले जाईल, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयातील सूत्रांनी दिली.

Web Title: Shortage of Covishield vaccine in sub-district hospital