माधवनगर जकात नाक्याच्या जागेत शाॅपिंग काॅम्प्लेक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:29 IST2021-08-27T04:29:31+5:302021-08-27T04:29:31+5:30

ओळी : माधवनगर रस्त्यावरील महापालिकेचा जकात नाका सध्या बंद अवस्थेत आहे. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेच्या वतीने माधवनगर ...

Shopping Complex at Madhavnagar Jakat Naka | माधवनगर जकात नाक्याच्या जागेत शाॅपिंग काॅम्प्लेक्स

माधवनगर जकात नाक्याच्या जागेत शाॅपिंग काॅम्प्लेक्स

ओळी : माधवनगर रस्त्यावरील महापालिकेचा जकात नाका सध्या बंद अवस्थेत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिकेच्या वतीने माधवनगर जकात नाक्याच्या जागेवर १४ व्यावसायिक गाळ्यांचे शाॅपिंग काॅम्प्लेक्स उभारले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून एक कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असल्याचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी सांगितले.

सूर्यवंशी म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीतून १२ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या निधीतून शहरातील १३६ कामांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. महासभेने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, तो जिल्हा नियोजनकडेही पाठविला आहे. या निधीतून सदस्यांच्या वाॅर्डातील विकासकामांचा समावेश केला आहे.

माधवनगर रोडवर महापालिकेचे जकात नाक्याची जागा आहे. सध्या जकात नाका बंद असल्याने या जागेचा अवैध धंदासाठी वापर वाढला आहे. त्यामुळे या जागेवर शाॅपिंग काॅम्प्लेक्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा नियोजन समितीकडून १० कोटींचा निधी मंजूर झाला होता. या निधीतून एक कोटी ३५ हजार रुपये खर्चून १४ व्यावसायिक गाळे उभारली जातील. या गाळ्यांची मालकी महापालिकेची राहणार असून, वार्षिक भाडेपट्टीने ते व्यवसायासाठी दिले जाणार आहेत. त्यामुळे महापालिकेला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळेल.

शहरात वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मुख्य बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी होत आहे. बाजारपेठेतील पार्किंगच्या जागा विकसित करण्याची मागणी होत होती. त्याची दखल घेत जयश्री चित्रमंदिराजवळील पार्किंग जागा विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. १२ लाख ५६ हजार रुपये खर्चून तिथे काँक्रीट केले जाणार आहे. मिरजेतील लक्ष्मी मार्केटमध्ये आतील बाजूला नवीन पत्रे घालण्यासाठी ९ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. पत्र बदलण्याबाबत व्यापाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासून मागणी होती, असेही सूर्यवंशी यांनी सांगितले.

चौकट

ऑनलाइन सेवांचा लवकरच प्रारंभ

महापालिकेच्या वतीने थकबाकीचा दाखला, होर्डिंग्ज परवाने, विवाह नोंदणी, नाट्यगृह बुकिंगसाठी ऑनलाइन सेवा सुरू केली जाणार आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांनी या सेवांचे सादरीकरण केले. त्यामुळे नागरिकांना घरबसल्याच महापालिकेच्या सुविधांचा लाभ घेता येणार असल्याचेही महापौर सूर्यवंशी यांनी सांगितले.

Web Title: Shopping Complex at Madhavnagar Jakat Naka