शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीराव नाईक यांना भाजपची उमेदवारी मिळणार

By admin | Updated: September 18, 2014 23:27 IST

इस्लामपूर विधानसभा : काँग्रेसची स्वबळाची तयारी

अशोक पाटील -इस्लामपूर -काँग्रेस आघाडी व महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. मात्र इस्लामपुरात ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे, तर शिराळ्यात माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांना भाजपची उमेदवारी मिळणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. इस्लामपुरात शिवसेनेचा उमेदवार निश्चित नाही. शेवटच्या टप्प्यात तगड्या उमेदवारालाच शिवसेना तिकीट देईल, असे चित्र आहे. काँग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असून, माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी मतदारसंघात तळ ठोकला आहे. त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्र पाटील यांना रिंगणात उतरवण्याचे संकेत दिले आहे. यामुळे जयंत पाटील यांच्याविरोधातील मतांची विभागणी होणार असल्याने महायुतीत अस्वस्थता आहे.मागील निवडणुकीत शिराळ्यातून काँग्रेसकडून शिवाजीराव नाईक यांनी निवडणूक लढवली होती, परंतु काँग्रेसच्याच नेत्यांनी दिवसा हात आणि रात्री टीव्हीचा प्रचार केल्याने अपक्ष मानसिंगराव नाईक विजयी झाले होते. यावेळी मात्र चित्र उलटे आहे. ज्यांनी गतवेळी आघाडीचा धर्म पाळला नाही, तेच निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागले आहेत. यामुळे मानसिंगराव नाईक यांची गोची झाली. शेवटच्या टप्प्यात देशमुख गटाच्या सत्यजित देशमुख यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. गेले दोन दिवस शिवाजीराव नाईक मुंबईत तळ ठोकून आहेत. मागील निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेनेतून दि. बा. पाटील यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी ही जागा भाजपला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी नाईक स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उतरणार असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केले होते, मात्र ही जागा भाजपला जाणार असल्याचे दिसताच शेट्टी आणि नाईक यांनी भाजपच्या नेत्यांशी संपर्क साधून उमेदवारी निश्चित केल्याचे समजते.इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांच्याविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून नानासाहेब महाडिक यांनी मोर्चेबांधणीस सुरु केली आहे. हा मतदारसंघ शिवसेनेला जाणार असल्याने महाडिक यांनी ‘मातोश्री’वर संपर्क ठेवला आहे, परंतु अद्यापही हिरवा कंदील मिळालेला नाही. नुकतेच राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले जि. प. सदस्य भीमराव माने हेही निवडणूक तयारीला लागले आहेत. अंतिम टप्प्यात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.प्रतीक पाटलांची एन्ट्रीसांगलीतील काँग्रेसचे माजी खासदार प्रतीक पाटील यांनी गेल्या चार दिवसांपासून जयंत पाटील यांच्या मतदारसंघात एन्ट्री करून काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवावी, यासाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्र पाटील यांना ताकद देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मतविभागणी होणार असल्याने सध्यातरी जयंत पाटील यांच्याविरोधातील मंडळी अस्वस्थ दिसत आहेत.