सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्याध्यक्षांचा राजीनामा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 11:59 IST2024-04-15T11:57:45+5:302024-04-15T11:59:11+5:30

सुशांत घोरपडे म्हैसाळ : सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष शिवाजी महाडिक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ...

Shivaji Mahadik of Sangli District Youth Nationalist Ajit Pawar Group resigns | सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्याध्यक्षांचा राजीनामा 

सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्याध्यक्षांचा राजीनामा 

सुशांत घोरपडे

म्हैसाळ : सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष शिवाजी महाडिक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.

शिवाजी महाडिक हे अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून काम करत होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्यानंतर शिवाजी महाडिक यांनी अजित पवार गटात प्रवेश करत जिल्हा युवक कार्याध्यक्ष पद स्विकारले होते.

मात्र लोकसभेच्या पूर्वसंध्येला शिवाजी महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्याकडे दिला. त्यामुळे महाडिक लवकरच मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वग्रही परतणार असल्याचे वृत्त सुत्राने दिले.

Web Title: Shivaji Mahadik of Sangli District Youth Nationalist Ajit Pawar Group resigns