शिवसेना मिरज शहरप्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:21 IST2021-07-17T04:21:49+5:302021-07-17T04:21:49+5:30

मिरज : मिरजेतील रेल्वे ठेकेदाराचा बँक खात्याचा कोरा धनादेश व आरटीजीएस पावती चोरून २० लाख रुपयांची रक्कम आपल्या खात्यात ...

Shiv Sena Miraj mayor Chandrakant Mangure arrested | शिवसेना मिरज शहरप्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांना अटक

शिवसेना मिरज शहरप्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांना अटक

मिरज : मिरजेतील रेल्वे ठेकेदाराचा बँक खात्याचा कोरा धनादेश व आरटीजीएस पावती चोरून २० लाख रुपयांची रक्कम आपल्या खात्यात जमा करून त्यातील १५ लाख रुपये काढून घेतल्याप्रकरणी शिवसेना मिरज शहरप्रमुख चंद्रकांत मैंगुरे याला गांधी चौक पोलिसांनी अटक केली. मैंगुरे याला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

मधुकुमार (रा. माहेश्वरी निवास, सांगली) यांनी याबाबत सहा महिन्यांपूर्वी गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली होती. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर चंद्रकांत मैंगुरे याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. अटकपूर्व जामीन फेटाळल्याने शुक्रवारी पोलिसांनी त्याला अटक केली.

रेल्वेचे ठेकेदार मधुकुमार यांच्या कंपनीचे मिरजेतील बँक ऑफ इंडियामध्ये करंट खाते आहे. मधुकुमार यांची सही असलेला कोरा धनादेश व एक आरटीजीएस पावती काही महिन्यांपूर्वी चोरीला गेली होती. चोरलेला कोरा धनादेश व आरटीजीएस पावतीचा वापर करून कंपनीच्या खात्यातील २० लाख रुपये २६ आक्टोबर रोजी चंद्रकांत मैंगुरे याच्या बँक खात्यात जमा झाले हाेते. यापैकी १५ लाखांची रक्कम काढून घेण्यात आल्याची तक्रार मधुकुमार यांनी गांधी चौकी पोलिसात दिली होती. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर चंद्रकांत मैंगुरे याने संबंधित ठेकेदाराने रेल्वेचे काम देण्यासाठी घेतलेली रक्कम परत देऊन धनादेश चोरीची खोटी तक्रार केल्याचा दावा केला होता. त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

Web Title: Shiv Sena Miraj mayor Chandrakant Mangure arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.