भवानीनगर येथे ५ पासून शैला सायनाकर व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST2021-02-05T07:28:32+5:302021-02-05T07:28:32+5:30

शिरटे : भवानीनगर (ता. वाळवा) येथील जागृती साहित्य संस्कार मंडळाच्यावतीने शुक्रवार दि. ५ ते दि. ७ फेब्रुवारीअखेर कवयित्री शैला ...

Shaila Sainakar lecture series from 5 at Bhavani Nagar | भवानीनगर येथे ५ पासून शैला सायनाकर व्याख्यानमाला

भवानीनगर येथे ५ पासून शैला सायनाकर व्याख्यानमाला

शिरटे : भवानीनगर (ता. वाळवा) येथील जागृती साहित्य संस्कार मंडळाच्यावतीने शुक्रवार दि. ५ ते दि. ७ फेब्रुवारीअखेर कवयित्री शैला सायनाकर व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे.

दि. ६ रोजी श्रीमंत कोकाटे यांच्याहस्ते ‘जागृती’ पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सुहास सावंत, उपाध्यक्षा वनीता मोहिते व सचिव निवास पवार यांनी दिली.

क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या व्याख्यानमालेचे यंदा १८ वे वर्ष आहे. दि. ५ फेब्रुवारी रोजी इस्लामपूरचे पोलीस उपअधीक्षक कृष्णत पिंगळे यांचे ‘आजची तरुणाई आणि पोलिसांची भूमिका’ या विषयावर, ६ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ इतिहास संशोधक व साहित्यिक डॉ. श्रीमंत कोकाटे यांचे ‘शिवचरित्रातून आज काय शिकावे’ यावर व्याख्यान होणार आहे. याचदिवशी गावचे पुत्र व कोपरगाव येथील सहकारी संस्थांचे शासकीय लेखापरीक्षक दीपक सावंत यांना जागृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

७ फेब्रुवारी रोजी शिराळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांचे ‘मी कसा घडलो’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. व्याख्यानमालेसाठी श्रोत्यांनी मास्क वापरणे सक्तीचे आहे.

यावेळी संजय पाटील, विजयकुमार सावंत, प्रकाश संकपाळ, धनंजय राजहंस, सचिन गोडसे, सुवर्णा कांबळे, वैशाली सिंहासने, ज्योती मेहता, धनश्री राजहंस, शुभांगी पाटील, स्वाती मोहिते उपस्थित होत्या.

फोटो - ०१०२२०२१-आयएसएलएम-दिपक सावंत

Web Title: Shaila Sainakar lecture series from 5 at Bhavani Nagar