शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

विट्यामध्ये साडेसतरा लाखांची वीज चोरी, महावितरणच्या पथकाने केली कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 18:10 IST

मीटर वीज वापरापेक्षा कमी गतीने रीडिंग नोंदवित असल्याचे निदर्शनास आले

सांगली : पारे रोड, विटा (ता. खानापूर) येथील एका ग्राहकाने खडी क्रशिंग प्रकल्पासाठी वीजमीटरमध्ये फेरफार करून १७ लाख ५५ हजार ७२१ रुपयांची वीजचोरी केली. वीज चोरीप्रकरणी विलास एकनाथ कदम यांच्याविरुद्ध इस्लामपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या पथकाने ही कारवाई केली आहे.विटा येथील वीजग्राहक विलास कदम यांच्या खडी क्रशिंग प्रकल्पाच्या वीज मीटरची पंचासमक्ष तपासणी केली होती. केबलच्या आर. वाय. बी. फेजच्या वायर्स मीटरला जोडलेल्या होत्या. मात्र, केबलची न्यूट्रल वायर अधांतरी असल्याचे दिसून आले. ग्राहकाकडून मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी केल्याचे दिसून आले. मीटर सीलही शंकास्पद दिसून आले. त्यानंतर पंच व ग्राहक प्रतिनिधीसमक्ष वीज मीटर सील केले.

मीटर वीज वापरापेक्षा कमी गतीने रीडिंग नोंदवित असल्याचे निदर्शनास आले. ऑगस्ट २०१९ ते  १९ नोव्हेंबर २०२१ महिने आणि जून २०२२ ते ऑक्टोबर २०२२ हे पाच महिने अशी एकूण ३३ महिन्यांत ग्राहकाने एक लक्ष पाच हजार ३५८ युनिटची वीज चोरी केली आहे. या ग्राहकाच्या वीज चोरीच्या युनिटची १७ लाख ५५ हजार ७२१ रुपये रक्कम आहे. नोटीस देऊनही वीज बिल भरले नसल्याने महावितरणने गुन्हा दाखल केला आहे.  भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता महेशकुमार राऊत, सहायक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी चैत्रा पै, वरिष्ठ तंत्रज्ञ वसंत सकटे, अमित नारे यांनी ही कारवाई केली.वीज चोरी थांबवा!जिल्ह्यातील वीजग्राहकांनी कोणत्याही प्रकारे वीज चोरी करू नये, अन्यथा महावितरणच्या भरारी पथकातर्फे कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांनी दिला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीelectricityवीजtheftचोरीmahavitaranमहावितरण