शहरं
Join us  
Trending Stories
1
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
2
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
3
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
4
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
5
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
6
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
7
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
8
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
9
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
10
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
11
"जो रामाचा नाही, तो कामाचा नाही, ते सत्तेत असताना घरात बसले होते"; देवेंद्र फडणवीस यांची टीका
12
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
13
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
14
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
15
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
16
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
17
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
18
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
19
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
20
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे विनाअनुदानित सातशेवर शिक्षकांची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 10:38 IST

यामध्ये सांगली जिल्ह्यातील सातशे शिक्षकांचा समावेश आहे. या विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना पूर्वी संस्थाचालक तीन ते चार हजार रुपये देत होते. शासन अनुदान देण्याची घोषणा केल्यापासून संस्था चालकांनी तेही देणे बंद केले आहे.

ठळक मुद्देसंस्थांकडूनही टाळाटाळ । शाळांना दहा वर्षांत शंभर टक्के अनुदान नाहीच

सांगली : जिल्ह्यातील विनाअनुदानित शाळांत सातशेहून अधिक शिक्षकशिक्षकेतर कर्मचारी गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून काम करीत आहेत. अनेक आंदोलने, लाठ्या-काठ्या खाल्ल्यानंतर शासनाने दहा वर्षापूर्वी ‘कायम’ शब्द काढला. पण, त्यानंतर गेल्या पाच ते सहा वर्षात शासनाने विनाअनुदानित शाळांना अनुदानच न दिल्यामुळे शिक्षकांचे आर्थिक शोषण सुरु आहे. लॉकडाऊनमध्ये तर या शिक्षकांची प्रचंड उपासमार होत असून याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

राज्य शासनाने कायम शब्द काढून दहा वर्षे झाली. अनुदान मंजुरीचा विषय गेली सात वर्षे राज्यात गाजतोय. गेली दहा ते पंधरा वर्षे विनाअनुदानित शिक्षक विनावेतन काम करत आहेत. आझाद मैदानावर लाठ्या, काठ्या खाल्ल्यानंतर शासनाने दि. १३ सप्टेंबर २०१९ रोजी २० टक्के व ४० टक्के अनुदान मंजुरीचा निर्णय घेतला. तसा आदेशही काढला. या निर्णयाची आजअखेर शासनाने अंमलबजावणी केली नाही. राज्यातील १६४८ शाळा आणि १५० तुकड्यांतील ४५ हजार शिक्षक पगाराच्या प्रतीक्षेत आहेत.

यामध्ये सांगली जिल्ह्यातील सातशे शिक्षकांचा समावेश आहे. या विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना पूर्वी संस्थाचालक तीन ते चार हजार रुपये देत होते. शासन अनुदान देण्याची घोषणा केल्यापासून संस्था चालकांनी तेही देणे बंद केले आहे. बिनपगारावर काम करणाऱ्या काही शिक्षकांनी खासगी शिकवणी चालू करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु केला होता. पण लॉकडाऊनपासून या शिक्षकांचे आर्थिक गणितच कोलमडले आहे.

प्राध्यापकांसमोर चरितार्थाचा प्रश्नजिल्ह्यातील अनेक विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांतील काही प्राध्यापकांचे अगदी वर्षभराचे वेतनही संस्थांनी थकवले आहे. आता प्राध्यापकांनी सुरू केलेले इतर व्यवसायही थंडावले आहेत. लॉकडाऊनच्या काळातही आॅनलाईन वर्ग घेण्याची धडपड करताना प्राध्यापकांसमोर चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही खासगी संस्थांनी विद्यार्थ्यांकडून शंभर टक्के शैक्षणिक शुल्क वसूल करूनही प्राध्यापकांचे पगार मात्र दिले नाहीत, याबद्दल प्राध्यापकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शासनाने विनाअनुदानित शिक्षकांना न्याय द्यावा. सध्याची वेळ आंदोलने आणि मागण्या करण्याची निश्चितच नाही. पण, विनाअनुदानित शिक्षकांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. म्हणूनच या शिक्षकांना शासनाने न्याय देण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी दिली.

टॅग्स :Teacherशिक्षकMONEYपैसा