शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात परिचारिकांनी केलेली रुग्णसेवा अतुलनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:27 IST

इस्लामपूर येथे नर्सिंग महाविद्यालयातील परिचारिका कोर्सच्या विद्यार्थिनींच्या शपथविधी समारंभात डॉ. नरसिंह देशमुख यांनी मार्गदर्शन केले. या वेळी शामरावकाका पाटील, ...

इस्लामपूर येथे नर्सिंग महाविद्यालयातील परिचारिका कोर्सच्या विद्यार्थिनींच्या शपथविधी समारंभात डॉ. नरसिंह देशमुख यांनी मार्गदर्शन केले. या वेळी शामरावकाका पाटील, प्रा. शामराव पाटील, आर. डी. सावंत, एन. आर. मुजावर, डॉ. विलास काळे उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : परिचारिका हे सेवेचे व्रत आहे. फ्लॉरेन्स नाईन्टिंगल यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून हे व्रत पार पाडा. कोरोनाच्या प्रतिकूल काळात परिचारिकांनी केलेली रुग्णांची सेवा देशातील जनता कधीही विसरणार नाही, असा विश्वास उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नरसिंह देशमुख यांनी व्यक्त केला.

कासेगाव शिक्षण संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमधील परिचारिका कोर्सच्या विद्यार्थिनींच्या शपथविधी समारंभात ते बोलत होते. केआरपी कॉलेजच्या सभागृहात हा समारंभ झाला. कासेगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, संस्थेचे सचिव आर. डी. सावंत, केआरपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विलास काळे, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य एन. आर. मुजावर उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी जीव धोक्यात घालत कोरोनाच्या काळात आमच्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसेवा केली आहे. त्यांच्या कामाचे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे.

प्रा. शामराव पाटील म्हणाले, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरातील विद्यार्थी, विशेषत: विद्यार्थिनींना सेवेच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी नर्सिंग महाविद्यालय सुरू केले आहे. या माध्यमातून अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी करिअर करत असल्याचे पाहून समाधान वाटते.

प्राचार्य आर. डी. सावंत म्हणाले, तुम्ही जेव्हा परिचारिका कोर्स पूर्ण करून बाहेरच्या जगात जाल, तेव्हा तुमच्यासाठी शासकीय, खाजगी क्षेत्रात मोठ्या संधी आहेत.

प्राचार्य एन. आर. मुजावर यांनी स्वागत व प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या १६ वर्षांच्या प्रगतीचा आढावा मांडला. डॉ. महेश बोधे यांनी विद्यार्थिनींना शपथ दिली. दीप्ती कांबळे यांनी आभार मानले. परवीन शेख, निखिल वायदंडे यांनी सूत्रसंचालन केले.