कडेगाव तहसील कार्यालयात नोंदीसाठी स्वतंत्र फेरफार कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:25 IST2021-02-14T04:25:29+5:302021-02-14T04:25:29+5:30

डॉ. पाटील म्हणाल्या, या मोहिमेत ज्या लोकांच्या अद्याप फेरफार नोंदी झालेल्या नाहीत. त्यांच्या नोंदी तातडीने होणार आहेत. कक्षामध्ये ...

Separate change room for registration in Kadegaon tehsil office | कडेगाव तहसील कार्यालयात नोंदीसाठी स्वतंत्र फेरफार कक्ष

कडेगाव तहसील कार्यालयात नोंदीसाठी स्वतंत्र फेरफार कक्ष

डॉ. पाटील म्हणाल्या, या मोहिमेत ज्या लोकांच्या अद्याप फेरफार नोंदी झालेल्या नाहीत. त्यांच्या नोंदी तातडीने होणार आहेत. कक्षामध्ये प्राप्त झालेले अर्ज त्याच दिवशी संबंधित तलाठी यांच्याकडे वर्ग करण्यात येणार आहेत. संबंधित अर्जदारांनी शासनाच्या परिपत्रकानुसार आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे.

चौकट

दर बुधवारी संगणकीकृत सातबारा दुरुस्ती

आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी येथील तहसील कार्यालयात संगणीकृत सातबारामधील चुका-दुरुस्तीकरिता कॅम्प घेतले जाणार आहेत. या कॅम्पासाठी महसूल कर्मचारी यांच्यासह स्वतः तहसीलदार नायब तहसीलदार हे उपस्थित राहतील. ज्यांचे संगणकीकृत सातबारा दुरुस्ती करावयाची आहे. त्यांनी या कॅम्पमध्ये अर्ज करून आपला संगणकीकृत सातबारा दुरुस्ती करून घ्यावा, असे आवाहन तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांनी केले.

Web Title: Separate change room for registration in Kadegaon tehsil office