हॉटेल मालकासह दोघा संशयितांचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:22 IST2021-02-05T07:22:04+5:302021-02-05T07:22:04+5:30

सांगली : कर्नाळ रस्त्यावरील हॉटेल रणवीरमधील हाय प्रोफाइल वेश्‍या अड्ड्याप्रकरणी हॉटेलमालक राघवेंद्र शेट्टी, त्याचा भाऊ रवींद्र उर्फ रवीअण्णा कोरागा ...

The search for the two suspects, including the hotel owner, continues | हॉटेल मालकासह दोघा संशयितांचा शोध सुरू

हॉटेल मालकासह दोघा संशयितांचा शोध सुरू

सांगली : कर्नाळ रस्त्यावरील हॉटेल रणवीरमधील हाय प्रोफाइल वेश्‍या अड्ड्याप्रकरणी हॉटेलमालक राघवेंद्र शेट्टी, त्याचा भाऊ रवींद्र उर्फ रवीअण्णा कोरागा शेट्टी हे दोघे अद्याप पसार आहेत. पोलिसांकडून दोन्ही संशयितांचा शोध सुरू आहे. हॉटेल व्यवस्थापक राजेश बाबू यादव (वय २०, रा हॉटेल रणवीर, कर्नाळ रस्ता), दलाल शिवाजी नारायण गोंधळे उर्फ वाघळे (रा. तासगाव) हे दोघे पोलीस कोठडीत आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहराबाहेर कर्नाळ रस्त्यावर असलेल्या हॉटेल रणवीरमध्ये हॉटेलमालक शेट्टीबंधूंनी हाय प्रोफाइल वेश्या अड्डा सुरू केला होता. यासाठी मूळच्या हैदराबाद व बंगालमधील आणि सध्या मुंबईत असलेल्या दोन तरुणींना वेश्‍या व्यवसायासाठी आणून ठेवले होते. काही दिवसांपासून हॉटेलमध्ये चोरीछुपे हा प्रकार सुरू होता. हॉटेलमधील व्यवस्थापक राजेश यादव हा दलाल शिवाजी गोंधळेकडून ग्राहक आल्यानंतर त्यांना पैसे घेऊन वेश्‍या पुरवत होता. गोंधळे हा एका ग्राहकाकडून तीन हजार रुपये घेत होता. हॉटेल रणवीरमधील या प्रकाराची माहिती मिळताच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने छापा टाकला. त्या वेळी पोलीस निरीक्षक अरुण देवकर व सत्यजीत पंडित हेही हाॅटेलमध्ये आढळून आले होते. छाप्यानंतर शेट्टीबंधू फरार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी ठिकठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहेत.

Web Title: The search for the two suspects, including the hotel owner, continues