Sangli: आटपाडीत शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 18:17 IST2025-03-27T18:17:26+5:302025-03-27T18:17:45+5:30
आटपाडी : आटपाडी येथे आपल्या आजीकडे शिक्षणासाठी आलेल्या समर्थ अरुण ढोके (वय १२, मूळ रा. पंढरपूर, जि. सोलापूर) शाळकरी ...

Sangli: आटपाडीत शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट
आटपाडी : आटपाडी येथे आपल्या आजीकडे शिक्षणासाठी आलेल्या समर्थ अरुण ढोके (वय १२, मूळ रा. पंढरपूर, जि. सोलापूर) शाळकरी मुलाने मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. आटपाडी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पंढरपूर येथील समर्थ हा आटपाडी येथील मापटेमळा परिसरात आजीकडे शिक्षणासाठी राहण्यास होता. तो एका खासगी ॲकॅडमीमध्ये शिक्षण घेत होता. मापटेमळा येथे आजी व समर्थ असे दोघेच राहत होते. मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आजी तेथूनच काही अंतरावर असलेल्या वडिलांकडे गेली होती. यावेळी समर्थ हा एकटाच घरी अभ्यासासाठी थांबला होता.
दरम्यान रात्री पावणे दहा वाजण्याच्या पूर्वी मापटेमळा येथील पाण्याच्या टाकीच्या मागे गळफास लावून घेतल्याचे दिसले. यावेळी शेजारी राहत असलेले दिनेश जाधव यांनी त्यास मयत अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. याबाबत ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कारंडे यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.