सतीश पाटील यांचे कार्य युवा पिढीला मार्गदर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:25 IST2021-02-05T07:25:58+5:302021-02-05T07:25:58+5:30

आष्टा : अशोका ॲग्रोचे संस्थापक डॉ. सतीश पाटील यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर कृषी उद्योगाचे छोटेसे रोपटे लावले. त्याचा ...

Satish Patil's work guides the younger generation | सतीश पाटील यांचे कार्य युवा पिढीला मार्गदर्शक

सतीश पाटील यांचे कार्य युवा पिढीला मार्गदर्शक

आष्टा : अशोका ॲग्रोचे संस्थापक डॉ. सतीश पाटील यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर कृषी उद्योगाचे छोटेसे रोपटे लावले. त्याचा वेलू देशभर पसरला आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार सेंद्रिय खते देऊन शेती सुधारण्यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न भूषणावह आहेत. त्यांनी कृषी औद्योगिक क्षेत्रात केलेले काम युवा पिढीला मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

पोखर्णी (ता. वाळवा) येथे अशोका ॲग्रोचे संस्थापक डॉ. सतीश पाटील व कृषिभूषण डॉ. संजीव माने यांना दिल्ली येथील कॉमनवेल्थ होकेशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल तसेच विविध पिकांत उच्चांकी उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांच्या सत्कार समारंभात आमदार मानसिंगराव नाईक बोलत होते.

यावेळी कृष्णाकाठ उद्योगसमूहाचे संस्थापक जे. के. बापू जाधव, कॉमनवेल्थ होकेशनल युनिव्हर्सिटीच्या आंतरराष्ट्रीय संबंध आशिया विभागाचे डीन सुनील बेळगावे, उद्योजक नवीनकुमार जैन, बापू हजारे, रणजित पाटील, सरपंच रेखाताई पाटील, नंदकुमार पाटील, डॉ. पी. एम. पाटील, दिग्विजय पाटील, प्रतीक पाटील, आनंदराव पाटील प्रमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. सतीश पाटील व कृषिभूषण डॉ. संजीव माने यांचा सत्कार करण्यात आला.

जे. के. बापू जाधव म्हणाले, अशोका ॲग्रोच्या सेंद्रिय खतांमुळे शेती वाचली. शेतकरी मोठा करण्याचे काम सतीश पाटील यांनी केले आहे.

सुनील बेळगावे, डॉ. सतीश पाटील, डॉ. संजीव माने, नवीनकुमार जैन, बापू हजारे यांनी मनोगत व्यक्त केले. नंदकुमार पाटील यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. बिभीषण पाटील यांनी आभार मानले.

चौकट

प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव

पोपट पाटील, बाळासाहेब चव्हाण, शिवाजीराव कचरे, रघुनाथ पवार, सुरेश पाटील, संदीप मुरकर, प्रदीप पाटील, संजय पाटील, बाबासाहेब पाटील, प्रताप पाटील, भारत पाटील, शीतल पाटील, विजय कदम, गिरीश तावडे, जालिंदर मस्के, सुनील चौगुले, तानाजी सुर्वे, राजू गायकवाड, प्रमोद पवार, अधिकराव माळी, सोनहिरा ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी, योगेश चौगुले, अनिल पाटील, संजीव बर्डे या प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.

Web Title: Satish Patil's work guides the younger generation